नेमकं काय झालं आहे हरनाज सांधूला? मिस युनिव्हर्सचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का

मिस युनिव्हर्स झाल्यावर तिच्या सौंदर्याचं सगळीकडून कौतुक झालं होतं. नुकतेच हरनाजने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर  शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. मात्र अभिनेत्रीचे हे फोटो पाहून काहींनी तिच्या या फोटोंचं कौतुक केलंय तर अनेकांनी ट्रोलही केलं आहे.

Updated: Aug 22, 2023, 09:02 PM IST
नेमकं काय झालं आहे हरनाज सांधूला? मिस युनिव्हर्सचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का title=

मुंबई : चंदीगडच्या हरनाज संधूने वयाच्या 21 व्या वर्षाी मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा जिंकून भारताचं नाव यशाच्या उंचीवर पोहचवलं आहे.  ही स्पर्धा जिंकल्यानंतर हरनाजचं नाव जगभर गाजलं. त्याचबरोबर, हरनाज मिस युनिव्हर्स 2021 बनली तेव्हा संपूर्ण देशाने एकत्र हा उत्साह साजरा केला होता. आता लवकरच मिस युनिव्हर्स हरनाज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. 

मिस युनिव्हर्स झाल्यावर तिच्या सौंदर्याचं सगळीकडून कौतुक झालं होतं. नुकतेच हरनाजने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर  शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. मात्र अभिनेत्रीचे हे फोटो पाहून काहींनी तिच्या या फोटोंचं कौतुक केलंय तर अनेकांनी ट्रोलही केलं आहे.

कौतुक करत एका चाहत्यान लिहीलं, हा फोटो पाहून सर्वत्र आग लागू शकते. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, यू लूक अमेझिंग. तर अजून एकाने लिहीलंय,  Ms संधू धमाकेदार परतली आहे. तर अजून एकाने लिहीलंय, तुमचा प्रोफाइल पिक्चर म्हणून शेवटचा फोटो बनवण्याची याचिका. तर अजून एकाने लिहीलंय, माझा विश्वास बसत नाही हरनाझ संधू मला तू कॅप्टनम्हणून आवडतेस आणि तू डिजर्व्ह करतेस यासाठी कारण तू प्रेम करण्यास पात्र आहेस तू जगातील परिपूर्ण स्त्री आहेस तुझ्यावर प्रेम करतो हरनाझ संधू. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्सा वर्षाव करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 

तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. एका चाहत्याने म्हटलंय, काय होतीस आता काय झालीस, तर अजून एकाने म्हटलंय, तु स्वत:वर कधी मेहनत घेणार, तर अजून एकाने लिहीलंय, काय झालंय तुला हरनाज. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत युजर्सने तिला ट्रोल केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिस युनिव्हर्स 2021 बनल्यानंतर हरनाजचा हा बदलेला लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मिस युनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हरनाजचं वजन खूप वाढलं आहे. त्याचबरोबर ती तिच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आली आहे. तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती सध्या बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.  

तर याआधी हरनाजने बॉडी शेमिंगवर ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना हरनाजने  पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, 'मी माझ्या शरीराचा आदर करते. मला सेलिआक आजार आहे, मला बॉडी शेमिंग आवडत नाही.