राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर जेव्हा AC रिपेअर करायला इरफ़ान खान गेला, आणि

इरफान खान सुपरस्टार राजेश खन्ना यांचा मोठा चाहता होता.

Updated: May 12, 2021, 07:07 PM IST
राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर  जेव्हा AC रिपेअर करायला इरफ़ान खान गेला, आणि title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना आणि इरफान खान आज या जगात नाहीत. पण या दोन कलाकारांच्या आठवणी आपल्या हृदयात कायम जिवंत आहेत. राजेश खन्ना हे 20व्या शतकातील सुपरस्टार होते तर इरफान खान 21व्या शतकातील एक मोठा स्टार मानला जायचा.

दोन्ही कलाकारांशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत जो खूप मनोरंजक आहे
इरफान खान सुपरस्टार राजेश खन्ना यांचा मोठा चाहता होता. हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. अभिनेता होण्यापूर्वी इरफान खान राजेश खन्ना यांना भेटण्याच्या बहाण्याने बंगल्यात एसी रिपेअर करायला गेला होता.

इरफान खानने एका मुलाखतीत स्वत: हून हे सांगितलं होतं. यावेळी तो म्हणाला होता की, अभिनेता होण्यापूर्वी तो मुंबईत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा, या काळात तो मुंबईत राहण्यासाठी एसी दुरुस्तीचं काम करायचा. अशा परिस्थितीत मेकॅनिक म्हणून त्याने राजेश खन्ना यांच्या घरच्या एसीच सर्विसींगचं काम मिळविलं.

तो म्हणाला की, ''मला चांगलं आठवतं जेव्हा मी राजेश खन्ना साहेबांच्या बंगल्यामध्ये पोहोचलो तेव्हा त्यांच्या नोकराने दार उघडलं. थोडा वेळ मी त्यांच घर पहातच राहिलो. मी इतका अप्रतिम बांगला पहिल्यांदाच पाहिला होता. यावेळी मी बंगल्यात सगळीकडे राजेश खन्ना साहेबांना शोधण्याचा प्रयत्न करीत होतो, कदाचित त्या दिवशी माझं नशीब वाईट होतं कारण त्या दिवशी ते घरीच नव्हते''.

या मुलाखतीदरम्यान इरफान खानने राजेश खन्ना यांच्या बद्दलही बर्‍याच गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की, राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये जे स्टारडम मिळवलं ते पुन्हा कधीचं कुणाच्या नशीबी लागलं नाही. ते इंडस्ट्रीमधील पहिले आणि सर्वात मोठे सुपरस्टार होते  तो नेहमीच त्याच सिंहासनावर विराजमान राहतील.

आज जरी बॉलिवूडच्या या दोन दिग्गज कलाकारांनी या जगाला निरोप दिला असला, तरी त्यांच्या अभिनय आणि डायलॉगने ते नेहमी चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील.