मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य चित्रपट कांतारा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. तर, बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'डॉक्टर जी' चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक आठवडाही झाला नाही आणि आतापासून चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. याशिवाय आता मणिरत्नमच्या PS-1 च्या कलेक्शनमध्येही घसरण सुरू झाली आहे. दुसरीकडे हृतिक रोशनच्या 'विक्रम वेधा' आणि चिरंजीवीच्या 'गॉडफादर'ची अवस्था फारच वाईट आहे. दरम्यान, सर्व चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
डॉक्टर जी
आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंगचा 'डॉक्टर जी' चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटले आहेत. स्लो ओपनिंग असलेल्या या चित्रपटाचे वीकेंडला चांगले कलेक्शन झाले. आता 'डॉक्टर जी'चा सहाव्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार बुधवारी या चित्रपटानं केवळ 1.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'डॉक्टर जी'चे एकूण कलेक्शन 19.82 कोटी रुपये आहे.
हेही वाचा : Khan आणि Bachchan कुटुंबात यंदा दिवाळी सेलिब्रेशन नाही; अखेर मोठं कारण समोर
पोन्नियन सेल्वन
मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन' या चित्रपटानं झटपट ओपनिंग केली होती. आठवडाभर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. यानंतर चित्रपटाच्या कमाईत घट होऊ लागली. प्राथमिक आकडेवारीनुसार, PS-1 चे 20 व्या दिवसापर्यंतचे कलेक्शन 252.80 कोटी रुपये होते.
कांतारा
दाक्षिणात्य स्मॉल बजेट चित्रपट 'कंतारा'नं साऊथमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिंदीतील 'कांतारा'चं वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 'कंतारा'नं 20 व्या दिवशी 7 कोटी रुपये जमा केले आहेत. या चित्रपटाचा एकूण 133.75 कोटींचा गल्ला झाला आहे.
विक्रम वेधा
हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट पहिल्या दिवसापासून संथगतीने जात होता. या चित्रपटाद्वारे हृतिक रोशन चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. हा चित्रपट सुपरहिट ठरेल, अशी आशा होती, मात्र आता 'विक्रम वेधा'लाही प्रेक्षक मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटानं 20 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी 35 लाखांचा गल्ला जमवला आहे. 'विक्रम वेधा'चे कलेक्शन 77.66 कोटी रुपये आहे.
गॉडफादर
चिरंजीवी आणि सलमान खान स्टारर 'गॉडफादर' या चित्रपटाचीही अवस्था बिकट आहे. दोन सुपरस्टार असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकला नाही. रिपोर्ट्सनुसार, 'गॉडफादर'नं 15 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी 40 लाख रुपयांचा गल्ला केला आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 72.41 कोटी रुपये आहे.