बेअरसोबत असतानाच रजनीकांतसमोर वाघ आला आणि....

पाहा त्या क्षणाचा थरारक व्हिडिओ 

Updated: Mar 9, 2020, 04:15 PM IST
बेअरसोबत असतानाच रजनीकांतसमोर वाघ आला आणि....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रुपेरी पडद्यावर थलैवाच्या एंट्रीवर शिट्ट्या आणि टाळ्या पडणार, हे प्रत्येकालाच अपेक्षित असतं. मुळात सुपरस्टार रजनीकांत यांचं कोणतंही रुप प्रेक्षकांना कायमच प्रभावी आणि धमाकेदार वाटतं. अशा या अभिनेत्याने त्यांच्या कारकिर्दीत यशाचं परमोच्च शिखर गाठलं आहे. असे रजनीकांत आता वन्य प्राण्यांचा सर्रास वावर असणाऱ्या जंगलामध्ये एंट्री करण्यास सज्ज झाले आहेत. किंबहुना त्यांनी या अनोख्या दुनियेत प्रवेशही केला आहे. 

Man Vs Wild फेम बेअर ग्रिल्स याने ट्विटर अकाऊंटवरुन रजनीकांत यांचा सहभाग असणाऱ्या Into the wild या कार्यक्रमाच्या खास भागाचा प्रोमो सर्वांच्या भेटीला आणला आहे. या व्हिडिओमध्ये जंगलांच्या वाटेवर कलाविश्वातल या सुपरस्टारचा अनोखा अंदाज पाहायाला मिळत आहे. बेअरच्या साथीने काही थरारक गोष्टींमध्ये सहभागी होणं, त्याला प्रतिप्रश्न करणं आणि समोर चक्क वाघ आल्यानंतर काय करावं यासाठीची रजनीकांत यांची धडपड पाहण्याजोगी आहे. 

हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ज्यामध्ये बेअर ग्रिल्स आणि रजनीकांत यांच्या एका थरारक प्रवासाठी झलक पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला बेअरने तितकंच समर्पक कॅप्शनही दिलं आहे. 

पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल

'सुपरस्टार रजनीकांत यांची सकारात्मकता आणि कोणत्याही गोष्टीपुढे हतबल न होता समोर आलेलं प्रत्येक आव्हान त्यांच्यापुढे फिकं पडतं', असं लिहित त्याने या महान कलाकाराविषयी आदराची भावनाही व्यक्त केली. २३ मार्चला या कार्यक्रमाचा अतिशय महत्त्वाचा असा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.