रणवीर नव्हे, कोणा दुसऱ्यावरच खिळली दीपिकाची नजर

एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत....

Updated: Dec 18, 2019, 07:01 PM IST
रणवीर नव्हे, कोणा दुसऱ्यावरच खिळली दीपिकाची नजर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सहसा दीपिका आणि रणवीर म्हणजेच बी टाऊनची अतिशय लोकप्रिय जोडी ही प्रेक्षकांच्या मनावर बहुविध कारणांनी राज्य करत असते. चर्चासत्र, पुरस्कार सोहळे, सेलिब्रिटी पार्टी अशा विविध प्रसंगी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यावरच सर्वांच्या नजरा असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दीपिका चर्चेत आहे ती म्हणजे एका दुसऱ्याच व्यक्तीसोबतच्या व्हिडिओमुळे. 

बरं हा तिच्या आगामी चित्रपटाचा व्हिडिओही नाही. त्यामुळे तसे तर्क न लावलेलेच बरे. ज्या व्यक्तीसोबत दीपिकाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे ती व्यक्तीसुद्धा कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. हा चेहरा म्हणजे अभिनेता हृतिक रोशन याचा. 

ख्रिसमसच्या दिवसांची धूम सर्वत्र पाहायला मिळत असतानाच दीपिका आणि हृतिकही त्याच अंदाजात दिसले. ज्यामध्ये हृतिककडे दीपिका एकटक पाहताना दिसत आहे. ती एकटक पाहते ते म्हणजे हृतिकच्या सुरेख अंदाजासाठी. एक पेस्ट्री हातात घेऊन दीपिका त्यावर लावण्यात आलेला टॅग स्वत:च्या डोक्यावर ठेवताना दिसत आहे. तर, हृतिक ही पेस्ट्री स्वत: खाण्यापूर्वी सर्वप्रथम ती दीपिकाला भरवताना दिसत आहे. चक्क हृतिक आपल्याला पेस्ट्री भरवत असल्याचं पाहून दीपिकाचीही नजर काही त्याच्यावरुन हटताना दिसत नाही. 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

बी- टाऊनच्या या दोन्ही कलाकारांचा हा दिलखुलास अंदाज सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे. मुख्य म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल होताच या दोघांनीही आता थेट रुपेरी पडद्यावर एकत्र यावी अशी इच्छाही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आता चाहत्यांची ही इच्छा कधी पूर्ण होणार याचं उत्तर मात्र खुद्द हृतिक आणि दीपिकाच देणार आहेत.