अभिनेता इंदर कुमार यांचं निधन

बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार यांचं निधन झालंय. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Updated: Jul 28, 2017, 01:37 PM IST
अभिनेता इंदर कुमार यांचं निधन title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता इंदर कुमार यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ते ४३ वर्षांचे होते.

वीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय केला. त्यांच्या कारकिर्दीतले बरेसचे रोल हे साईड अॅक्टरचे होते.

तिरछी टोपीवाले, कही प्यार न हो जाए, पेईंग गेस्ट, वॉण्टेड यासारख्या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकांचं कौतुक झालं होतं. क्योंकी सांस भी कभी बहु थी, या मालिकेतलं मिहीर विरानी हे पात्र चांगलंच गाजलं होतं. सलमान खान आणि कुटुंबीयांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. सलमानसोबत त्यांनी अनेक चित्रपटांत कामही केलं होतं. 

 

.