आता शड्डू ठोका! नागराज मंजुळेंच्या चित्रपटात काम करायचंय? संधी आली चालून, असं द्या ऑडिशन

Nagraj Manjule Movie Audition: ऑलम्पिकच्या इतिहासात महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यवर चित्रपट येत आहे. त्यासाठी आता नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी ऑडिशनसाठी अर्ज मागवले आहेत.

Updated: Jul 4, 2023, 08:22 AM IST
आता शड्डू ठोका! नागराज मंजुळेंच्या चित्रपटात काम करायचंय? संधी आली चालून, असं द्या ऑडिशन title=
Nagraj Manjule Movie Audition

Audition For Khashaba Movie : सैराट चित्रपट आला अन् संपूर्ण महाराष्ट्राला झिंगाटचं याड लागलं. फँड्री, नाळ, सैराट, झुंड असे सुपरहिट चित्रपटामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचं नाव चर्चेत आलं. मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत नागराज मंजुळे यांचं नाव घेतलं जातंय. अशातच आता तुम्हाला देखील नागराज मंजुळे यांच्यासह काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. याच चित्रपटासाठी आता ऑडिशनला सुरूवात झाली आहे.

एखाद्या चित्रपटात आपल्याला संधी मिळावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. अशातच आता संधी चालून आली आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित येणाऱ्या खाशाबा चित्रपटासाठी (Nagraj Manjule New Movie Khashaba) ऑडिशन आला सुरू झाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज पोटराव मंजुळे करणार आहेत. त्यासाठी आता ऑडिशनला सुरूवात झालीये. 7 ते 25 वर्षे वयोगटासाठी ही ऑडिशन (Audition For Khashaba Movie) असणार आहे. त्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आली आहे. मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक आहे. तसेच शरीरयष्टी दाखवणारे तीन फोटो देखील तुम्हाला काढावे लागतील. त्याचबरोबर 30 सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ (Video) शेअर करावा लागणार आहे. एवढंच नाही तर 30 सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा एखादा व्हिडीओ रेकॉर्ड करावा लागेल. या ऑडिशनसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 20 जुलै असणार आहे.

पाहा पोस्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aatpat (@aatpatproduction)

आटपाट प्रोडक्शन हाऊस (aatpat production) आणि नागराज मंजुळे यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘खाशाबा’ चित्रपटाच्या ऑडिशनबद्दलची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी ऑडिशनच्या अटी, त्यासाठी लागणारी वयोमर्यादा याची सविस्तर माहिती दिली आहे. स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान अशी खाशाबा जाधव यांची ओळख आहे. त्याच्या आयुष्यावरील पहिल्या बायोपिकची घोषणा नागराज मंजुळे यांनी केली होती.

आणखी वाचा - रुपेरी पडद्यावर साकारणार 'खाशाबा', Nagraj Manjule दिग्दर्शित पहिला बायोपिक लवकर भेटीला!

काय म्हणाले नागराज मंजुळे?

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात महाशिवरात्री निमित्त कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नागराज मंजुळे यांनी मोठी घोषणा केली होती. खऱ्या आणि अस्सल मातीमधील, पण जागतिक स्तरावर नाव कमवणाऱ्या खेळाडूची खरी ओळख लोकांपर्यंत न्यायची आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, असा चित्रपट करण्याचा माझा प्रयत्न राहिल, असं नागराज मंजुळे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता सिनेमात खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारणार? यावर देखील चर्चा होताना दिसत आहे.