मुंबई : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिचं आपल्या सासरच्या सदस्यांशी असलेलं प्रेमळ नातं अनेकदा दिसून आलंय. खासकरून मीराचं आपल्या दिराशी अर्थातच 'धडक' फेम अभिनेता ईशान खट्टर याच्याशी बॉ़न्डिंग चांगलं आहे. ईशान आणि मीरा अनेकदा मीडियासमोरही दिसलीय. परंतु, नुकताच समोर आलेल्या एका व्हिडिओत मीडियासमोरच ईशानचा हात झटकताना दिसतेय.
मुंबईच्या जुहू भागात पार पडलेल्या एका कार्यक्रमातून बाहेर पडताना मीरा राजपूत आणि ईशान खट्टर एकत्रच बाहेर पडताना दिसले... यावेळी ते हसताना दिसत होते. दोघांनी मीडियासमोर फोटोसाठी पोझही दिली. यावेळी ईशाननं अजाणतेपणी आपल्या वहिणीच्या पाठिवर हात ठेवला.
ईशानच्या या कृत्यावर मीरानं लगेचच प्रतिक्रिया दिली... आणि ईशानचा हात झटकला.
थोड्याच वेळात ईशानलाही आपल्याकडून काहितरी चुकल्याची जाणीव झाली. त्यानं याबाबत मीराशी बोलण्याचाही प्रयत्न केला. परंतु, यावेळी मीरा चांगलीच संतापलेली दिसती. यानंतर दोघंही गाडीत बसले आणि तिथून निघून गेले.
काही दिवसांपूर्वी मीरानं आपल्या दुसऱ्या अपत्याला अर्थात झेनला जन्म दिला तेव्हा तिच्यापाशी हॉस्पीटलमध्ये सर्वात अगोदर पोहचणाऱ्यांमध्ये सासू नीलिमा अझीम आणि दीर ईशान खट्टर यांचा नंबर पहिला होता. त्यानंतर हे कुटुंब दिवाळीच्या निमित्तानंही एकत्र दिसलं होतं.