विकी- कतरिनाच्या प्रायव्हेट क्षणांमध्ये 'ही' व्यक्ती कोण?

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि प्रसिद्ध अभिनेत्री जेव्हा विवाहबंधनात अडकले तेव्हापासून या कपलची सगळीकडे जोरदार चर्चा सुरुये.

Updated: May 18, 2022, 04:29 PM IST
विकी- कतरिनाच्या प्रायव्हेट क्षणांमध्ये 'ही' व्यक्ती कोण? title=

मुंबई :  बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि प्रसिद्ध अभिनेत्री जेव्हा विवाहबंधनात अडकले तेव्हापासून या कपलची सगळीकडे जोरदार चर्चा सुरुये. काही लोकांना धक्का बसला. कारण हे कपल असं होतं की, त्यांनी कधीही त्यांचं रिलेशनशिप स्वीकारलं नाही. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या लग्नाची बातमीही समोर आली तेव्हा अनेकांचा विश्वास बसला नाही. मात्र लग्नानंतर या कपलचे प्रेम चव्हाट्यावर येत आहे. नुकताच या कपलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे मिळून लोहरी साजरी करत आहेत.

विकी कतरिनाचा जुना व्हिडिओ
विकी कतरिनाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विकी कतरिना एकमेकांच्या मिठीत उभे राहून गप्पा मारत आहेत. पण तेवढ्यात विकीचा एक मित्र येतो आणि तो विकीच्या पाठीवर थोपाटतो. विकी कौशलने मागे वळून पाहितो आणि हे पाहून कतरिना दचकते. विकीही कतरिनाला सोडून त्याच्या मित्रासोबत वेळ घालवू लागतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

न्यूयॉर्कमध्ये वाढदिवस साजरा केला
विकी कतरिना रोज एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. नुकताच विकी कौशलने त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतर अभिनेत्याचा हा पहिला वाढदिवस होता. जो अभिनेत्याने पत्नी अभिनेत्री कतरिना कैफसोबत साजरा केला. विशेष बाब म्हणजे या अभिनेत्याने न्यूयॉर्कमध्ये आपला खास दिवस साजरा केला. यादरम्यान विकीसोबत त्याची पत्नी कतरिना आणि काही जवळचे लोकं दिसले.