लोकप्रिय अभिनेत्रीचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

राज कपूर यांनी दिली पहिला ब्रेक 

Updated: Mar 26, 2020, 08:32 AM IST
लोकप्रिय अभिनेत्रीचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन  title=

मुंबई : पन्नाशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री निम्मी यांच बुधवारी संध्याकाळी निधन झालं. मुंबईतील सरला नर्सिंग होममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वयाच्या १६ वर्षांपासून निम्मी यांनी सिनेक्षेत्रात काम केलंय. 

साल १९४९ ते १९६५ पर्यंत निम्मी सिनेमांत सक्रिय होत्या. त्याकाळातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येत असे. त्यांच खरं नाव 'नवाब बानो.' निम्मी यांनी लोकप्रिय लेखक एस अली राजा यांच्यासोबत लग्न केलं. अली राजा यांच २००७ मध्ये निधन झालं. या दोघांना कुणीही मुलं नसल्यामुळे त्या एकट्या होत्या. 

राज कपूर यांनी सिनेमांत दिला होता ब्रेक

निम्मी यांचा शोध हा राजकपूर यांनी लावला होता. रिपोर्टनुसार, त्यांनीच नवाब बानो यांच नाव बदलून निम्मी असं ठेवलं. 'बरसात' या सिनेमात त्यांना पहिला ब्रेक मिळाला. हा सिनेमा हिट झाल्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांत काम केलं. त्यांनी 'आन', 'उडन खटोला', 'भाई भाई', 'कुंदन', 'मेरे महबूब' सारख्या सिनेमांत काम करून लोकप्रियता मिळवली. 

आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात त्या अतिशय लोकप्रिय होत्या. दिलीप कुमार ते अगदी राज कपूर, अशोक कुमार, धर्मेंद्र सारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलंय. निम्मी यांच्या निधनानंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ट्विट करून माहिती दिली.