मुंबई : मोहम्मद पैगंबरांवरून करण्यात आलेल्या टीप्पणीचा वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये (Prophet Muhammad) . भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता या मुद्यावरूनही राजकारणास सुरुवात झाली आहे. या वादाचे पडसाद नेतेमंडळींच्या घरांपर्यंत पोहोचले.
देशाच्या राजकारणात पेटलेल्या या वादावर आता कलाजगतातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्येष्ठ नेते आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडणाऱ्या अभिनेता नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) , यांनी सदर प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.
मोहम्मद पैगंबरांवरील टीप्पणीच्या वादावर एका मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडलं. सरकारनं याप्रकरणी कारवाई केली, पण यासाठीसुद्धा उशीर झाला असंच ते म्हणाले.
'या प्रकरणी आपली भूमिका मांडण्यास आणि नाराजी व्यक्त करण्यात सरकारनं एक आठवडा लावला. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्थान सारख्या देशांमधून अशा प्रकारची व्यक्तव्य समोर येत असतात. परंतू भारतातील जबाबदार व्यक्तींकडून अशा बाबी समोर येत नाहीत', असं ते म्हणाले.
नुपूर शर्मा यांच्याविषयी वक्तव्य करताना शाह म्हणाले, 'त्या कोणताही अराजकता माजवणारा घटक नसून, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत.' तुम्ही मला असं कोणतंही वक्तव्य किंवा एखादा व्हिडीओ, रेकॉर्डिंग दाखवा जिथं मुसलमानांनी हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधानांना आवाहन...
(PM modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांनी या सर्व लोकांना समजवावं असं आवाहन शाह यांनी केलं. आजच्या दिवसांमध्ये जर कोणीही मुस्लिम त्यांच्या हक्कांविषयी बोलू लागला, तर त्यांच्यावर निशाणा साधला जातो असं म्हणत वस्तुस्थिती मांडण्यापासून शाह मागे हटले नाहीत.