John Abraham Angry on Journalist : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या 'वेदा' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. जॉन यात पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे. पण या सगळ्यालाच घेऊन विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर जॉन अब्राहम हा संतापला आहे. इतकंच नाही तर त्यानं एका पत्रकाराला 'मूर्ख' देखील म्हटलं आहे. हा संपूर्ण प्रकार 'वेदा' च्या ट्रेलर लॉंचच्यावेळी घडला होता. नक्की काय प्रकार घडला ते जाणून घेऊया...
'वेदा' च्या ट्रेलर लॉंचच्यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारानं असा काही प्रश्न विचारला की जॉन अब्राहम संतापला. पत्रकारानं जॉनला प्रश्न विचारला की आता आम्ही पाहतोय की 'तू एकामागे एक चित्रपट करतोयस, पण त्यातल्या तुझ्या भूमिका या सारख्याच वाटतात. त्यातही अॅक्शनकडे जास्त लक्ष देतोय. तर असं का आहे, काही वेगळं आणानं सर.' पुढे पत्रकार काही बोलणार त्याआधी जॉन अब्राहमला संतापला.
संतापलेला जॉन अब्राहम त्या पत्रकारालामध्येच थांबवत म्हणाला, 'तुम्ही हा चित्रपट पाहिलात का? मी बोलू शकतो का की हा फार खराब प्रश्न आहे आणि मूर्ख आहेस? तुम्ही आधी चित्रपट पाहा आणि त्यानंतर जज करा. त्यानंतर तू जे काही बोलशील ते मी ऐकेन. नाही मी तर तुला स्पष्टपणे सांगेन की हा चित्रपट वेगळा आहे. माझ्या हिशोबानं हा एक खूप इंटेन्स परफॉर्मन्स आहे जो मी केलाय. नक्कीच, तुम्ही चित्रपट पाहिला असेल. घाईत कोणता निर्णय घेऊ नका.' जॉनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे तर काही नेटकरी त्याला पाठिंबा देत आहेत.
याशिवाय ट्रेलर लॉन्चच्यावेळी जॉननं पापाराझीला वॉरनिंग देखील देतो आणि म्हणाला की सगळं रिकॉर्ड करू नका. तो म्हणाला, 'खूप मोठा काळ झाला. त्यामुळे श्वास घेऊ द्या आणि सगळं काही रेकॉर्ड करु नका. मी सगळ्यांचा चेहरा पाहिला आहे. मी पण बघतो सगळ्यांना. काही कॉन्ट्रोव्हर्सी नको. माझ्यासोबत कोणती कॉन्ट्रोव्हर्सी नाही.'
हेही वाचा : Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात मुकेश आणि नीता अंबानी?
दरम्यान, जॉनचा 'वेदा' हा चित्रपट निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेला आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉनसोबत शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया आणि अभिषेक बॅनर्जी देखील दिसणार आहेत.