उर्मिला निंबाळकरच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का?

अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकरने अलीकडेच बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

Updated: Sep 16, 2021, 03:20 PM IST
उर्मिला निंबाळकरच्या बाळाचा पहिला फोटो पाहिलात का? title=

मुंबई : अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकरने अलीकडेच बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने शेअर केलेले डोहाळेजेवणाचे फोटो, व्हिडिओ चांगलेच चर्चेत होते. एवढंच काय तर, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे तिटे फोटो हे सगळ्याचच लक्षवेधून घेणारे होते. आता नुकताच उर्मिलाने बाळासोबतचा पहिला वहिला फोटो पोस्ट केला आहे. 

उर्मिला आणि एक गोंडस बाळ! बाळाबरोबरचा पहिला फोटो, मला कधी कधी विश्वासच बसत नाही, ही गुंडाळलेली अळी, हा एक बरीटो, माझा आहे. असं हटके कॅप्शन या संतूर मॉमने दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

 बेबी बंप फ्लॉन्ट करत केलेल्या फोटोशूटमुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं. पण तिने ट्रोलर्सना यावर सडेतोड उत्तर दिलं. यूट्यूबर असल्याने तिने आपल्या प्रेग्नेंसीच्या दरम्यानचे अनेक क्षण आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केले. तिच्या व्हिडिओला ही मोठी पसंती मिळताना दिसून आली. उर्मिलाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.