'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'ने मोडला 'बाहुबली 2' सिनेमाचा रेकॉर्ड

 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाने 'बाहुबली 2' सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. एसएस राजामौली द्वारा दिग्दर्शित सिनेमाला भारतातील एकमेव यशस्वी सिनेमा मानला जातो. 

Updated: Feb 4, 2019, 10:31 AM IST
'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'ने मोडला 'बाहुबली 2' सिनेमाचा रेकॉर्ड  title=

मुंबई: अभिनेता विकी कौशलचा सिनेमा 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' सलग चौथ्या आठवड्यात बॉक्सऑफिसवर उंच भरारी घेत आहे. चाहत्यांनी सिनेमाला चांगलेच डोक्यावर घेतले आहे. ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'उरी' सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर अजुनही कायम आहे. 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाने 'बाहुबली 2' सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. एसएस राजामौली द्वारा दिग्दर्शित सिनेमाला भारतातील एकमेव यशस्वी सिनेमा मानला जातो. २०१९ या वर्षातील 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' पहिला ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा २०० कोटींच्या घरात पोहचला आहे.

 

'उरी' सिनेमाचा चढता क्रम पाहता सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचा दुसरा सिनेमा 'सोनचिड़िया'ची रिली़ज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आणखी दोन सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक सिनेमा १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. 

सिनेमा फक्त २८ कोटींच्या निर्मिती खर्चात तयार करण्यात आला आहे. अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या सिनेमाने दहाव्या दिवशी कोट्यवधींच्या कमाईचे शतक पूर्ण केले आहे.