viral Photos: उर्फी जावेदनं पार्टीमध्ये बहीण उरूसा जावेदलाही टाकल मागे... Late night Party Photos झाले व्हायरल!

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर पार्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती श्वेता गुरमीत कौरसोबत (Gurmeet Kaur) पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. एका फोटोमध्ये उर्फी तिच्या बहिणी उरुसा Urusa Javed) आणि अस्फीसोबत पोज देत होती. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Updated: Oct 30, 2022, 08:13 PM IST
viral Photos: उर्फी जावेदनं पार्टीमध्ये बहीण उरूसा जावेदलाही टाकल मागे... Late night Party Photos झाले व्हायरल!  title=

Urfi Javed Party: उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच आपल्या बोल्ड लुकमध्ये चर्चेत असतो. आपल्या विचित्र फॅशननं (Fashion) ती सगळ्यांनाच हैराण करून सोडते. आता उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच कारण मात्र तेवढेच खास आहे. उर्फी जावेद मुंबईत रुफटॉप पार्टीचा आनंद लुटताना दिसली होती आणि तिच्यासोबत तिच्या बहिणी, उरुसा जावेद आणि असफी जावेदही होत्या. बिग बॉस ओटीटी स्टार उर्फीनं यावेळी फंकी ड्रेसमध्ये पार्टीत मजा मारताना दिसली. याचे फोटोज तिनं इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. (urfi javed shares new photos on instagram of her new party videos)

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर पार्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती श्वेता गुरमीत कौरसोबत (Gurmeet Kaur) पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. एका फोटोमध्ये उर्फी तिच्या बहिणी उरुसा Urusa Javed) आणि अस्फीसोबत पोज देत होती. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

उर्फी जावेद (UrfI Javed) अनेक विषयांवर आपले मत व्यक्त करते. ती वारंवार अशा अभिनेत्यांना प्रतिसाद देते जे तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा ट्रोल्सची निंदा करून तिच्या दिसण्यावर टीका करतात. नुकतीच तिनं अशीच एख खळबळजनक पोस्ट शेअर केली होती. 

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

उर्फी जावेद आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यामध्येही सध्या वादारंभ झालेला पाहायला मिळाला. उर्फी जावेद (urfi Javed) सोशल मीडियावर तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी उर्फी पारंपारिक लूकमध्ये दिसली. यावेळी तिने जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कुर्ता घातला होता आणि त्यावर नेटचा दुपट्टा घेतला होता. उर्फीने तेथे उपस्थित फोटोग्राफर्संना मिठाईचे वाटप केले.  

उर्फी जावेद (urfi javed photo) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर तिचे नेहमीच फोटो व्हायरल होत आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती ट्रोलही होतेय. मात्र या ट्रोलिंगकडे लक्ष न देता ती नेहमीच हटके स्टाईलने प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करत असेत. उर्फी जावेद दररोजचे तिचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.