'हिला कपड्यांची कमतरताच', उर्फी जावेद अजब फॅशनमुळे पुन्हा ट्रोल

'कपडे कमी आणि....' Revealing कपड्यांमुळे उर्फी जावेद पुन्हा ट्रोल  

Bollywood Life | Updated: May 28, 2022, 11:58 AM IST
'हिला कपड्यांची कमतरताच', उर्फी जावेद अजब फॅशनमुळे पुन्हा ट्रोल title=

मुंबई : उर्फी जावेद कधी हटके तर कधी आपल्या अजब फॅशनमुळे चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड फॅशनमुळे ती ट्रोल होते तर कधी तिची चर्चा होते. उर्फीच्या अजब स्टाइलमुळे बऱ्याचदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पुन्हा एकदा उर्फी जावेद आपल्या फॅशनमुळे ट्रोल झाली. 

उर्फीने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या नको त्या फॅशनमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्फी मुंबईत फिरताना दिसली. गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये उर्फी दिसली. 

उर्फी स्वत: च आपले कपडे डिझाइन करते. तिने गुलाबी रंगाचा एक टॉप घातला आहे. तिने फ्रंट कट आऊटवाला टॉप घातला आहे. मागून हा ड्रेस बॅकलेस होता. त्यावर तिने हाय हिल्स घातले होते. 

उर्फीचा हा लूक खूप चर्चेत आला आहे. तिने हॉटेलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फीने कॉकटेल ड्रिंकही घेतल्याचं दिसत आहे. उर्फी खूप खूश असल्याचं दिसत आहे. 

उर्फीच्या या बोल्ड आणि अजब फॅशनवरून ट्रोलर्सनी तिला सुनावलं आहे. तिच्या रिव्हिलिंग ड्रेसवर कमेंट केली आहे. उर्फी आता विनाकपड्याचेही फोटो शेअर करेल. ते दिवसही फार दूर नाही. तिला कपड्यांची कमतरता भासत आहे. तिला कपडे घाला रे कोणीतरी अशा एक नाही तर अनेक कमेंट्स तिच्यासाठी युजर्सनी केल्या आहेत. 

दुसरा युजर म्हणाला तिच्यापेक्षा दुसरं काही वाईट या जगात असू शकत नाही. उर्फीच्या या अजब फॅशनवरून तिची फिरकी घेत असल्याचंही दिसत आहे. याआधी उर्फीने अंगावर वेगवेगळ्या स्टाईलने साखळी घालून अजब फॅशन केली होती. त्यावरूनही तिला ट्रोल करण्यात आलं होतं.