'माझं नाव घेणं सोडून द्या...!' इतकी प्रसिद्धी मिळूनही Urfi Javed असं का म्हणाली

उर्फी आणि चाहत यांची कॅट फाईट सध्या सुरूच आहे. 

Updated: Sep 18, 2022, 08:52 PM IST
 'माझं नाव घेणं सोडून द्या...!' इतकी प्रसिद्धी मिळूनही Urfi Javed असं का म्हणाली title=

Urfi Javed: आज उर्फी जावेदला (Urfi Javed) कोण नाही ओळखत... आपल्या विचित्र फॅशनमुळे आणि त्याहीपेक्षा ती विचित्र फॅशन कॅरी करण्याच्या आत्मविश्वासामुळे उर्फी जावेद प्रचंड ट्रोल होते. तिचे इन्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत आणि आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी उर्फी नेहमीच तत्पर असते. (urfi javed gets angry on calling her didi actress points out the person and says dont use my name for fame)

आपल्या या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा उर्फी जावेद हे नाव सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना आणि उर्फी यांच्यात सध्या एक वेगळाच वाद सुरू आहे. उर्फीला त्यांनी दीदी असं उद्गारल्यामुळे उर्फी प्रचंड चिडली आहे. 

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना (Television Actress Chahat Khanna) हिचे नाव 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेस चंद्रशेखरशी जोडल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर उर्फीने चाहत खन्ना यांची खिल्ली उडवली होती.

ज्यावर चाहतनं प्रत्युत्तर देत तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये उर्फीला उद्देशून एक पोस्ट शेअर केली. ज्यात ती उर्फीला दीदी असं म्हणाली. याचा संताप उर्फीला आला आणि तिला प्रत्यूत्तर देण्यासाठी उर्फीनं लगेचच एक पोस्ट तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. यात उर्फी म्हणते की, 'काकू मी तुमच्या अर्ध्या वयाची आहे आणि माझं नावं तुम्ही तुमच्या प्रसिद्धीसाठी वापरणं बंद करा.'

उर्फी आणि चाहत यांची कॅट फाईट सध्या सुरूच आहे. सध्या दोघींमध्ये मोठं रणकंदन माजलं आहे आणि त्यावरून आता सोशल मीडियावर या दोघांची झुंज पाहायला मिळते आहे.