Urfi Javed आणि Anjali Arora च्या बोल्ड डान्सने चाहत्यांना लावलं वेड!

Urfi Javed आणि Anjali Arora चा बोल्ड डान्स पाहिला का?, चाहते देखील जोमात!

Updated: Oct 13, 2022, 12:53 AM IST
Urfi Javed आणि Anjali Arora च्या बोल्ड डान्सने चाहत्यांना लावलं वेड!  title=

Urfi Javed and Anjali Arora Bold Dance Video: उर्फी जावेद तिच्या लूक आणि ड्रेसिंग (Urfi Javed Clothes) सेन्समुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी (Urfi Javed) तिच्या नवीन स्टाईलने दररोज इंटरनेटवर आग लावताना पहायला मिळते. सध्या अभिनेत्री तिच्या 'हाय ही ये मजबूरी' या नवीन गाण्यासाठी (Urfi Javed New Song) चर्चेत असल्याने उर्फी दररोज चर्चेचा विषय बनली आहे. उर्फी सतत तिच्या 'हाय ही ये मजबूरी' या या गाण्याचे प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, त्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Viral video) ती 'लॉक अप' स्पर्धक अंजली अरोरासोबत डान्स करताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये ती अंजली अरोरासोबत 'हाय हाय ये मजबूरी, ये मौसम आणि ये दूरी...' या गाण्यांवर डान्स करत आहे. 

आणखी वाचा - आजारपणानंतर Urfi Javed चं दमदार कमबॅक, रिव्हिलिंग ड्रेसमधला VIDEO पोस्ट

अंजली आणि उर्फीला एकत्र पाहून त्यांचे चाहते देखील घायाळ झालेत. अंजली उर्फीच्या डान्स स्टेप्स बरोबरीने फॉलो करताना दिसत आहे. यादरम्यान दोघांचे एक्सप्रेशन पाहून चाहत्यांना देखील व्हिडीओ शेअर करावा वाटतोय. उर्फीने तिच्या इन्टाग्रामवर (Urfi Javed Instagram ID) व्हिडीओ शेअर केला आहे. दोघींच्या किलर लूकमुळे चाहते देखील घायाळ झालेत.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

दरम्यान, उर्फीने (Urfi Javed New Dress) गोल्डन कलरचा ब्रॅलेट टॉप आणि ट्रास्फरंट स्कर्ट घातलेला दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग कानातले दिसत आहेत. तिने गडद रंगाची लिपस्टिक आणि केसांची पोनी बनवली आहे. त्याचबरोबर अंजलीने प्रिंटेड ग्रीन कलरचा लाँग वन पीस ड्रेस घातलाय. तर तिने केस मोकळे सोडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.