उर्वशी रौतेलाला झालीये लगीनघाई? मैत्रीणीच्या लग्नात नवरीपेक्षाही जास्त सजली

आपल्या सौंदर्याने  सर्वांना घायाळ करणारी उर्वशी रौतेला सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. 

Updated: Jun 22, 2021, 05:04 PM IST
 उर्वशी रौतेलाला झालीये लगीनघाई? मैत्रीणीच्या लग्नात नवरीपेक्षाही जास्त सजली  title=

मुंबई : आपल्या सौंदर्याने  सर्वांना घायाळ करणारी उर्वशी रौतेला सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. उर्वशी तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एका वधूप्रमाणे नटली आहे. उर्वशी मेहंदी सोहळ्यासाठी सज्ज आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते तिला विचारत आहेत की, तिचं लग्न ठरलं आहे का? मात्र उर्वशी  कोणाच्या मेहंदी सोहळ्यासाठी तयार झाली आहे हे मात्र तिने स्पष्टपणे सांगितलेलं नाही.

....तेरे प्यार का रंग चढ़ा है पिया
उर्वशी रौतेलाने तिचे तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ये सिर्फ मेहंदी नहीं, तेरे प्यार का रंग चढ़ा है पिया'. आता हा रंग आजीवन गमावू नये, यासाठी मी प्रार्थना करीन. यानंतर थोड्या वेळाने तिने आणखी एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, 'मेहंदी का रंग चढ़ा ऐसे मेरे हाथों में, जैसे तेरा इश्क चढ़ा है मेरी सांसों में.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुंदर दिसत आहे उर्वशी 
या दोन सुंदर फोटोनंतर उर्वशी रौतेलाने आणखी एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे कि, 'आणि अ‍ॅडव्हेंचरिंग सुरू झाले आहे' उर्वशी रौतेला या तिन्ही फोटोंमध्ये समान पोशाख परिधान केला आहे आणि ती वेगवेगळी पोज देत आहे. तिने लाल साडी, निळ्या ब्लाउजसह भारी ज्वेलरी परिधान केली आहे. तसंच, ती ब्राइडल मेकअपमध्येही दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशीचं नाही झालं लग्न 
या सर्व कॅप्शन अंतर्गत उर्वशी रौतेलाने हे स्पष्ट केलं आहे की, हा तिच्या लग्नाचा मेहंदी सोहळा नाही तर तिच्या जवळची मैत्रिण मुस्कानचा मेहंदी सोहळा आहे. या लूकमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते भरभरुन करत आहेत. या चारही फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सिरीजमध्ये दिसणार 
अलीकडेच उर्वशी रौतेला अरब सुपरस्टार मोहम्मद रमझानसोबत 'वर्सास बेबी' मध्ये दिसली होती. येत्या काळात ती जियो स्टुडिओच्या रणदीप हूडासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश' या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.