मुंबई : बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री झीनत अमान ही तिच्या काळातील सर्वात बोल्ड आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री होती. जिथे तिने आपल्या मादक सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. त्याच वेळी, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच आनंदी नव्हती. ती केवळ उत्कृष्ट चित्रपटांसाठीच नाही तर वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते.
झीनतने पहिलं लग्न अभिनेता संजय खानशी केलं. पण लवकरच तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. जरी या लग्नातून झीनतने खूप काही गमावलं होतं. तिच्या सौंदर्यासोबतच तिचं करिअरही हरवलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झीनत-संजयचं लग्न 1978 मध्ये झालं होतं. दोघांनी अगदी गुपचूप लग्न केलं. त्या काळात झीनत यशाच्या शिखरावर होती. संजय खान आधीच विवाहित आणि तीन मुलांचे वडिल असतानाही झीनतने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं.
संजय खान यांनी केला आरोप!
झीनतने तिच्या सौंदर्याने संपूर्ण इंडस्ट्रीला वेड लावलं होतं. तर ती स्वतः संजयची फॅन झाली होती. पण या प्रेमाने तिला तोडलं कारण संजय खान तिला अनेकदा मारहाण करत असे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर ही प्रेमकहाणी त्या वेळी बाहेर आली जेव्हा संजयने झीनतवर दिग्दर्शकासोबत अफेअर असल्याचा आरोप केला.
ही बाब झीनतला समजली तेव्हा ती लोणावळ्यात शूटिंग करत होती. संजयचं हे वक्तव्य ऐकून ती शूटिंग सोडून मुंबईला परतली. जेव्हा ती मुंबईला पोहोचली तेव्हा तिला समजलं की संजय त्याची पहिली पत्नी आणि मित्रांसोबत ताज हॉटेलमध्ये पार्टी करत होता. झीनत रागात तिथे पोहोचली. झीनतला असे पाहून संजय खानसह सगळेच आश्चर्यचकित झाले.
संजयने झीनतला हॉटेलच्या खोलीत बोलावलं जिथे त्याची पहिली पत्नी तिथे आधीच हजर होती. दरम्यान, दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. संजय इतका संतापला की त्याने झीनतला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. खोलीबाहेर ओरडण्याचे आवाजही ऐकू येत होते पण तिला वाचवण्यासाठी कोणीही धोका पत्करला नाही. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या झीनतला रुग्णालयात नेलं. उपचारादरम्यान झीनतच्या डोळ्यालाही मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून तिचा जबडाही तुटल्याचं आढळून आलं. अपघातानंतर झीनतवर अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.
झीनतचे दुसरं आणि तिसरं लग्न
संजय खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर झीनतने अभिनेता आणि निर्माता मजहर खानसोबत पुन्हा लग्न केलं आणि त्यांना दोन मुलंही आहेत. मजहर आता या जगात नाही. मजहरच्या मृत्यूनंतर झीनत अमानने अमान खन्ना उर्फ सरफराज जफर अहसानसोबत लग्न केलं. 2012 मध्ये हे लग्न झालं. सरफराज हा व्यवसायाने रिअल इस्टेट व्यावसायिक होता.
या लग्नाचीही खूप चर्चा झाली कारण त्या काळात झीनत ५९ वर्षांची होती तर सरफराज ३३ वर्षांची होता. मात्र, हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. हे लग्न मोडताना झीनतने सर्फराजवर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला. झीनतच्या एफआयआरनंतर सरफराजलाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि तो अनेक दिवस तुरुंगात होता.
जेव्हा झीनत यशाच्या शिखरावर होती, तेव्हा तिचे नाव अभिनेता देव आनंदसोबतही जोडलं गेलं होते. मात्र, तो अगोदरच विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता, त्यामुळे तो उघडपणे हे नाते कधीच स्वीकारू शकला नाही. यानंतर झीनतचे नाव पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खानसोबतही जोडलं गेलं.