मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आपल्या आयुष्यात त्या वेगवेगळे प्रयोग करतात. कधीकधी त्यांची अतरंगी फॅशन ट्रोलिंगचा विषय ठरते. अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी कपड्यांऐवजी फुलांचा आधार घेऊन अंग झाकत फोटोशूट केलं. या बोल्ड फोटोमुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं.
सोशल मीडियावर उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे आधीच चर्चेचा विषय बनली आहे. यामध्ये उर्फी जावेद अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे वरचढ ठरते. जेव्हा तिने फुलांच्या साहाय्याने आपले शरीर झाकले तेव्हा त्याच्या एका फोटोनं इंटरनेटवर खळबळ उडाली होती. फुलांपासून तयार केलेली बिकनी घालून तिने बोल्ड फोटोशूट केलं.
बिग बॉस OTT विनर दिव्या अग्रवाल आपल्या फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिने टॉपलेस होऊन होत फोटोशूट केलं. यावेळी तिने अंग झाकण्यासाठी फुलांचा वापर केला. तिला देखील खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
टीव्ही सीरियलमध्ये लीड रोल करणाऱ्या रश्मी देसाईनंही बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिने अंग झाकण्यासाठी फुलांचा वापर केला. तिच्या बोल्ड फोटोशूटवर तिला युजर्सनी खूप टीकाही केली होती. नागीन सीरियलमध्येही तिने काम केलं होतं.
अभिनेत्री शिवशक्ति सचदेव आणि अदिति भाटिया यांनी देखील बोल्ड फोटोशूट केलं. त्यांचे फोटो चर्चेचा विषय ठरले. त्यांनी फुलं अंगावर घेऊन टॉपलेस होत फोटोशूट केलं. त्यांचं फोटोशूट पाहून चाहत्यांनाच धक्का बसला होता.