अभिनय सोडून दुबईत 'ही' अभिनेत्री काय काम करतेय, पाहून विश्वास बसणार नाही

काहीशी दूर गेली आहे. 

Updated: Jan 4, 2022, 02:53 PM IST
अभिनय सोडून दुबईत 'ही' अभिनेत्री काय काम करतेय, पाहून विश्वास बसणार नाही  title=

मुंबई : ज्याप्रमाणे एखादी अभिनेत्री चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात येते, त्याचप्रमाणे मालिकांच्या माध्यमातूनही काही अभिनेत्री त्यांच्या परिनं प्रसिद्ध होत असतात. अशा अभिनेत्रींपैकीच एक चेहरा सध्या कलाजगतापासून काहीशी दूर गेली आहे. 

तिथं ती अभिनेत्री अभिनय नव्हे, तर चौकटीबाहेरचं काम करताना दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे ऋषिका मिहानी. 

'लव मरेज या अरेंज्ड मॅरेज' ( Love Marriage Ya Arranged Marriage), 'इश्कबाज' (Ishqbaaaz), 'इस प्यार को क्या नाम दूं-3' ( Iss Pyaar Ko Kya Naam Doon 3) अशा मालिका तिनं साकारल्या आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वीच ती दुबईला रवाना झाली. नव्या वर्षात आयुष्य एका नव्या टप्प्यापासून सुरु करण्यासाठी ती बरीच उत्सुक दिसत आहे. 

अभिनय क्षेत्र सोडत तिनं दुबईची वाट धरली आहे. जिथं ती रिअल इस्टेट कंसल्टंट म्हणून काम करत आहे. 

'मी आता प्रॉपर्टी कंसल्टंट म्हणून काम करत आहे आणि हे नवं करिअर पुढे नेण्यासाठी मी फार उत्सुक आहे. मला अपेक्षा आहे की मुंबईप्रमाणेच दुबईही मला आपलंसं करेल. 

मला अपेक्षित प्रेम आणि आदर मिळेल. मी सध्या स्वत:चीच परीक्षा घेऊ इच्छिते...'असं ती म्हणाली. 

मुंबईत जेव्हा केव्हा परत येईन आणि मला काम मिळेल तेव्हा मी अभिनयही करेन कारण मी एक अभिनेत्री आहे आणि कायम राहीन असा विश्वासही तिनं व्यक्त केला. 

मोठी विश्रांती घेत ज्यावेळी काही कलाकार त्यांच्या क्षेत्रात परततात तेव्हा त्यांचं उत्साहात स्वागत होतं, माझंही होईल असा आशावाद तिनं व्यक्त केला. 

भावाला पाहून, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीनं प्रोत्साहित होत ऋषिकानं रिअल इस्टेटमध्ये काम करण्याचा निर्णय़ घेतला. तेव्हा आता या क्षेत्रात ती कितपत यशस्वी ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.