मिलिंद सोमणचा 55 व्या वर्षी 'मेड इन इंडिया' Romance; पाहणाऱ्याची 'ही' अवस्था....

व्हिडीओ तुफान व्हायरल 

Updated: Sep 24, 2021, 08:16 AM IST
मिलिंद सोमणचा 55 व्या वर्षी 'मेड इन इंडिया' Romance; पाहणाऱ्याची 'ही' अवस्था....  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : अभिनेता, मॉडेल आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा आयर्न मॅन अशी ओळख असणाऱ्या मिलिंद सोमणसाठी प्रस्तावनेच्या शब्दांची ओळख नाही. कारण, त्याचं असणं हीच प्रस्तावना आहे. आपलं आयुष्य आपल्यात अटी- शर्तींवर जगणाऱ्या मिलिंदनं अनेकांनाच जगण्याचा आदर्श दिला आहे. वयाची पन्नाशी उलटून आता साठीच्या दिशेनं वाटचाल करत असला तरीही मिलिंद त्यातही आपलं वेगळेपण दाखवून देत आहे. 

आता तर, म्हणे या अवलियानं वयाच्या 55 व्या वर्षी रोमॅन्सच्या साऱ्या सीमा ओलांडत सर्वांनाच थक्क केलं आहे. एमटीवी शो सुपरमॉडल ऑफ द ईयर 2 MTV show supermodel of the year 2) या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मिलिंद सोमण सहभागी स्पर्धकांसोबत रॅम्पवर येतो आणि पाहता पाहता त्यांच्यासोबतची त्याची केमिस्ट्री मलायका अरोरा आणि समोरच असणाऱ्या अनुषा दांडेकर यांनाही स्वप्नवतच वाटते. 

मिलिंदची पिळदार शरीरयष्टी, मखमली धोतर नेसून ऐटीत समोर येणारा तो असं सारंकाही पाहायला मिळालं की, बस्स... त्याच्या फिमेल फॅन्सचं काळीज कुठच्या कुठे गेलंच म्हणून समजा. 

तूर्तास सध्या या प्रोमो व्हिडीओतच मिलिंदचे चाहते समाधान मानत असून, त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ज्याला लाखोच्या संख्येनं व्ह्यूज मिळत असून मिलिंद सोमण हा खऱ्या अर्थानं एव्हरग्रीन आहेत हेच पुन्हा सिद्ध होत आहे.