तुझ्यात जीव रंगला : मॅनेजर सखीमुळे राणा आणि पाठकबाईमध्ये पडकणार का फूट?

मुंबई : तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीवरील मालिका सध्या अतिशय लोकप्रिय होत आहे. या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. राणा आणि त्याच्या कुस्तीच्या जवळपास या मालिकेची कथा फिरत असते. आता इंटरनॅशनल कुस्तीसाठी राणाला तयार केल्यानंतर त्याची ट्रेनिंग सुरू झाली आहे. कोच असताना देखील राणाकरता मॅनेजर पाठवण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे मॅनेजर म्हणून सई ही पुण्याची मुलगी आली आहे. आणि आपल्याला माहितच आहे राणाला मुलींची किती अॅलर्जी आहे. पण आता राणा या मॅनेजर बाईकडून योग्य शिक्षण घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

राणा आणि पाठकबाईंच्या सुखी संसारात नंदीनी वहिनी कायमच काही ना काही करत असते. आता नंदिनी मॅनेजरबाईच्या निमित्ताने नवा डाव साधत आहे. पण असं असलं तरीही पाठकबाई राणाच्या पाठी खंबीरपणे उभ्या आहेत. आणि मॅनेजर सखीसोबत राहून ही स्पर्धा नक्की जिंकेल याचा विश्वास आहे. राणा आणि कुस्तीं अतुट नातं आहे. पण कायम यामध्ये अनेक कठिण प्रसंग येतात. पण राणा या कठिण प्रसंगाना देखील उत्तम प्रकारे सामोरे जाईल. राणाला मॅनेजरबाईने कुस्तीत 3 वेळा हरविल्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा झाली आहे. प्रत्येकजण राणाला सल्ला देत आहेत.