अंजली सखीच्या नादाला लागून राणाला गमवेल का?

अंजली सखीचं ऐकून चूक करतेय का? 

मुंबई : तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या २१ ऑगस्टच्या एपिसोडची नंदितापासून झाली. नंदिता आपला बंद केलेला फोन चालू करून बघते राणाचा फोन आला आहे का? पण तिला कुणाचाच फोन आला नाही. तेव्हा नंदिता म्हणते अशी मुंबई आठवायला पाहिजे म्हणजे पुन्हा कधी मुंबईत जाणार नाहीत. मग चंदा आणि नंदिता बलसारांकडे कशाला गेली असेल याचा विचार करतात. दरम्यान आता काहीही होवो पण सखीला इथून जाऊ देणार नाही आणि ती बलसारांना फोन करून सांगते की, राणा व अंजली जे काही सांगतील त्यावर विश्वास ठेऊ नका आणि जर का अंजली म्हणाली तरी सखीला राणा पासून दूर करू नका कारण राणाला इंटरनॅशनल कुस्ती जिंकायची आहे. दरम्यान बलसारांनी दिलेला चेक क्लिअर झाला का असे बलसारा नंदिताला विचारतात. तेव्हा नंदिता म्हणते माझे बँकेत खाते नाही तेव्हा मला कॅश द्या आणि जर पैसे दिले नाहीत तर राणाला सांगून त्याची कुस्ती बंद करायला लावेन. ते ऐकून बलसारा पैसे देण्याचे मान्य करतात. व म्हणतात राणा येणारच आहेत त्यांच्याशी तुमचे पैसे पाठवून देतो.

मग मात्र नंदिता घाबरते आणि म्हणते त्यांना यातले काही माहित नाही त्यांच्याशी पैसे पाठवू नका. दरम्यान तिकडं रस्त्यावरील माणसासोबत जेवण करून झाल्याचे पाहून सखी अंजलीला म्हणते की आता राणाला बलसारांच्या ऑफिसमध्ये जायला सांग. तेव्हा अंजली राणाला फोन करून बलसारांच्या ऑफिसमध्ये पोहचा असे सांगते व माझ्यामुळे तुम्हांला त्रास होतोय असे म्हणते. ते ऐकून दिवसभर फिरून कंटाळलेला राणा एकटा जायला तैयार होतो. व बलसारांचे ऑफिस शोधायला निघतो. तिकडे सुरज राणाच्या चिंतेत असतो तेवढ्याने लाडू येऊन त्याला राणा ला फोन करण्यासाठी सांगतो. त्याला बोलायचे आहे ऐकून सुरज राणाला फोन करतो व लाडूला बोलायला देतो. तेव्हा लाडू म्हणतो अरे तू हरवला आहेस असे जोराने ओरड मग बघ माऊ तुला शोधून काढेल, पण राणा म्हणतो मी नाही हरवलो तुझी माऊच हरवली आहे. पण लाडू त्याचे काही एक ऐकत नाही व राणाला जोरात ओरडण्यासाठी सांगतो. राणा थोडा वेळ हळूहळू ओरडतो आणि फोन कट करतो. दरम्यान सखी आणि अंजली बलसारांच्या ऑफिसमध्ये पोहचतात आणि त्या राणाची परीक्षा घेत आहोत असे सांगतात.

तेव्हा बलसारा सखीवर चिडतात व म्हणतात मी राणाला रेसलींग शिकवायला पाठवले होते. तेव्हा अंजली म्हणते की, सखीला मीच असे करायला सांगितलॆ होते आणि ते नक्कीच काहीतरी मार्ग काढून इथे पोहचतील याची मला खात्री आहे. पण बलसारा मात्र राणाच्या चिंतेने त्या दोघींवरही खूप चिडतात. राणाला पत्ता शोधण्यास संध्याकाळ होते, तेव्हा मध्येच राणाला एक मुलगी भेटते जिला राणा शिवाजी नगर कुठे आहे असे विचारतो, पण तिला मराठी येत नसल्याने ती राणाला इंग्रजीमध्ये पत्ता सांगते आणि निघून जाते. तेव्हा इंग्रजी शिकलो असतो तर फार बरे झाले असते असे राणा स्वतःशीच म्हणतो. हताश निराश झालेला राणा बाजूला असलेल्या एका बेंचवर बसतो आणि आपला फोन काढून अंजलीला फोन करू बघतो. परंतु फोनची बॅटरी संपलेली पाहून राणाचे अवसान गळून पडते आणि त्याला रडू कोसळते. आता बलसारांच्या ऑफिसवर कसे पोहचायचे या विचारात राणा हरवून जातो. दरम्यान आजची रात्र कशी व कुठे घालवायची हाच मोठा प्रश्न राणापुढे उभा राहतो. राणा बलसारांच्या ऑफिसला कसे पोहचेल व अंजली राणाचा फोन बंद झाल्याने राणाला कसे शोधून काढेल हे बघण्यासाठी तुझ्यात