कफ सिरप प्रमोट केल्याने विद्या बालनला नोटीस

फूड अॅण्ड ड्र्ग्ज असोसिएशनने विद्या बालनला कफ सिरपचे प्रमोशन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

Updated: Dec 4, 2017, 01:53 PM IST
  कफ सिरप प्रमोट केल्याने विद्या बालनला नोटीस  title=

नवी दिल्ली : 'तुम्हारी सुलू' सिनेमासाठी विद्या बालनचे सगळीकडून कौतूक होत आहे. स्टार स्क्रिन अॅवॉर्डमध्ये या सिनेमाला खूप सारे अॅवॉर्ड्स मिळाले.

मिड डेने दिलेल्या माहितीनुसार फूड अॅण्ड ड्र्ग्ज असोसिएशनने विद्या बालनला कफ सिरपचे प्रमोशन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

विद्या बालनने या सिनेमात लेट नाइट 'रेडिओ जॉकी'ची भूमिका केली आहे. 

सिनेमात प्रमोशन 

 सिनेमामध्ये विद्याने कफ सीरपची जाहिरात केल्याने एफडीएची नजर यावर पडली आहे. 'सुलु के हर सफर में उसका साथी, 'टोरेक्‍स' कफ सीरप हो तो अलविदा खांसी.'  म्हणजेच सुलूच्या प्रत्येक टप्प्यात तिचा साथी टोरेक्स कफ सीरप असेल तर खोकल्याची सुट्टी असा डायलॉग ती सिनेमात म्हणते.

मेडिकल अॅक्टिविस्ट डॉ. तुषार जगताप यांनी एफडीएकडे याविरुद्ध तक्रार केल्याचे वृत्त मिड डे ने दिले आहे. 

औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच

कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिले जाऊ शकते. त्याचा अशा प्रकारे प्रचार करता कामा नये.

डॉक्टर जेव्हा रुग्णाला अशाप्रकारचे औषध देतात तेव्हा एखादा डोस कसा, कितीवेळा घ्यायचा यासबंधी माहिती देतात. 

प्रोड्यूसर जबाबदार 

कफ सिरपचे प्रमोशन केल्यामूळे आम्ही सिनेमाच्या प्रमोशन हाऊसला अॅडवायसरी नोटीस पाठवणार असल्याचे एफडीए कमिशनर यांनी सांगितले.

औषधांना अशाप्रकारे प्रमोट करु नये ही प्रोड्यूसरची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पुष्टी जोडा

अशाप्रकारचा संदेश देत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या अशीही पुष्टी त्याला जोडली जावी असे आम्ही त्यांना सांगण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या तुम्हारी सुलूमध्ये विद्या बालन एका सामान्य गृहीणीची भूमिका साकारत आहे.