'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताने घातला ट्रान्सपरंट टॉप; पाण्यात केलेल्या कृत्यमुळे अभिनेत्री चर्चेत

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'रात्रीस खेळ चाले' अवघ्या काही वेळातच हिट झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडू लागलं होतं. विशेष म्हणजे अण्णा नाईक आणि शेवंता ही पात्र खूप गाजली. पाहता पाहता मालिका आणि त्यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागले. 

Updated: Nov 29, 2023, 06:56 PM IST
'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताने घातला ट्रान्सपरंट टॉप; पाण्यात केलेल्या कृत्यमुळे अभिनेत्री चर्चेत title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'रात्रीस खेळ चाले' अवघ्या काही वेळातच हिट झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडू लागलं होतं. विशेष म्हणजे अण्णा नाईक आणि शेवंता ही पात्र खूप गाजली. पाहता पाहता मालिका आणि त्यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागले. अण्णा म्हणू नका, किंवा मग आपल्या मादक अदांनी सर्वांनाच भूरळ घालणारी शेवंता असो. प्रत्येक पात्र सर्वांनाच हवंहवंसं वाटू लागलं. मात्र या मालिकेत अनेक चढ-उतार आले. या मालिकेचा दुसरा भाग प्रचंड हिट झाला होता. या मालिकेत माधव अभ्यंकर अण्णा नाईकांच्या भूमिकेत दिसले होते. तर शेवंता या पात्रात अपूर्वा नेमळेकर दिसली होती. अपूर्वाने शेवंता हे पात्र उचलून धरलं होतं. 

अपुर्वाला खरी ओळखं मिळाली ती म्हणजे शेवंता या पात्रातूनच. मात्र अपूर्वाने काही कारणांमुळे ही मालिका सोडली यानंतर या मालिकेत शेवंता या भूमिकेसाठी एक नवा चेहरा समोर आला. नंतर या भूमिकेत अभिनेत्री कृतिका तुळसकर ही अभिनेत्री दिसली. कृतिकालाही अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांकडून प्रेम मिळू लागलं. शेवंता या भूमिकेतून कृतिका तुळसकर घरा-घरात पोहचली. कृतिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. कृतिका कायमच तिचे सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकताच कृतिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते हैराण झाले आहेत.

या व्हिडीओत कृतिका पाण्यात दिसत आहे. या मध्ये तिच्या अदा आणि तिने परिधान केलेला ट्रान्सपरंट टॉप तिचा बोल्डनेस अजून वाढवत आहे. तिच्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ब्लू है पानी हे गाणं वाजत आहे. तर वॉटर बेबी असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, पाण्यात आग लावली. तर अजून एकाने लिहीलंय, हॉट तर अजून एकाने लिहीलंय NICE तर अनेकांनी तिच्या या फोटोवर फायर आणि हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कृतिका गेल्या अनेक वर्षांपासून ती रंगभूमी आणि मालिका जगतात सक्रिय आहे. ती कथ्थक विशारद आहे. तर, प्रोफेशनली ती सायकोलॉजिस्ट असली तरीही अभिनयाची आवडही जोपासत आहे. तर कृतिका दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांची पत्नी आहे.