वयाच्या 40 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट; टोपीनं झाकलं शरीर

कारण काहीही असो, अनुषाच्या या फोटोशूटची जबर चर्चा सुरु आहे हे मात्र नक्की. 

Updated: May 24, 2022, 10:07 AM IST
वयाच्या 40 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट; टोपीनं झाकलं शरीर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मुळची मराठमोळी, पण हिंदी कलाजगतामध्ये सक्रीय असणारी आणि पहुतांश परदेशी पगडा असणारी अभिनेत्री अनुषा दांडेकर कायमच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अनुषानं नेहमीच सोशल मीडियावर काही अफलातून फोटो शेअर केले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा तिनं काही फोटो नव्याने शेअर केले आहेत. (Topless Photos anusha dandekar instagram photo goes viral )

तिच्या या फोटोंवर पाहणाऱ्यांची नजरही रोखली आहे, कारण यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी अनुषानं ही जाहिरात केल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टकडे पाहून लक्षात येत आहे. 

कारण काहीही असो, अनुषाच्या या फोटोशूटची जबर चर्चा सुरु आहे हे मात्र नक्की. अभिनेता करण कुंद्रा याच्याशी असणाऱ्या नात्यात दुरावा आल्यापासून गेली काही वर्षे अनुषाचं बोल्ड रुप सर्वांसमोर येऊ लागलं आहे. 

आधीपासूनच तिनं फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात प्रगती केली, ज्यानंतर आतासुद्धा ही अभिनेत्री वयाच्या चाळीसाव्या वर्षातही तितकीच बोल्ड दिसत आहे. 

अनुषानं शेअर केलेल्या या फोटोशूटमध्ये तिचा टॉपलेस लूक पाहतच राहावा असा आहे. यामध्ये तिनं एका मोठ्या हॅटचा / काड्यांच्या टोपीचा वापर शरीर झाकण्यासाठी केला आहे. 

कुठेही अश्लीलता न जाणवू देता सुरेखरित्या तिचं हे फोटोशूट करण्यात आलं आहे.