फोटोत बहिणीसोबत दिसणारी चिमुकली आज करतेय बॉलिवूडवर राज्य

 बॉलीवूड सेलिब्रिटींची पर्सनल लाईफ असो किंवा त्यांच्या बालपणाबद्दल असो चाहत्यांना नेहमी त्यांच्याबद्दल ऐकायला खूप आवडतं.

Updated: Jun 29, 2022, 04:03 PM IST
फोटोत बहिणीसोबत दिसणारी चिमुकली आज करतेय बॉलिवूडवर राज्य title=

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींची पर्सनल लाईफ असो किंवा त्यांच्या बालपणाबद्दल असो चाहत्यांना नेहमी त्यांच्याबद्दल ऐकायला खूप आवडतं.  बॉलीवूड स्टार्सचे कुटुंबीयासोबतचे फोटो असोत किंवा त्यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. नवीन व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक गोंडस मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत पोज देताना दिसत आहे.

फोटोत दिसणाऱ्या या दोन्ही मुली आता खूप मोठ्या स्टार झाल्या आहेत. दोघीही उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. नुकताच तिचा एक चित्रपट सुपरहिट झाला. कदाचित तुम्ही या दोन स्टार बहिणींना ओळखलं असेल आणि जर तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, 80 आणि 90 च्या दशकातील सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री फराह नाज आणि तब्बूचा हा फोटो आहे.

दोघीही बहिणी मोठ्या झाल्या आहेत आणि अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, तब्बू आणि फराह लहानपणीही खूप क्यूट होत्या. फराह नंतर चित्रपटांमधून गायब झाली, पण तब्बू अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे आणि तिने एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच तिचा भूल भुलैया हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत होती. ती जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा ती तिच्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते. तब्बूची फॅन फॉलोइंग कोटींच्या घरात आहे. ती आता कमी चित्रपट करते. पण चाहते तिच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. तब्बूने तिच्या काळात सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे आणि एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.