प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ही घटना शुक्रवारी रात्री दुर्गमचेरुवु केबल ब्रिजजवळ घडली.

Updated: Sep 11, 2021, 03:18 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात, उपचारासाठी रुग्णालयात दाखल title=

मुंबई : टॉलीवूड अभिनेता साई धरम तेज याचा शुक्रवारी रात्री बाईक अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री  दुर्गमचेरुवु केबल ब्रिजजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, साई धरम तेज स्पोर्ट्स बाईक चालवत होता आणि चिखलामुळे त्याची बाईक स्लिप झाली आणि त्याचा अपघात झाला. या दरम्यान त्याने हेल्मेट घातलं होतं. 

या अपघातानंतर साई धरम तेजला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर योग्य उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेनंतर अभिनेत्याच्या टीमने एक निवेदन जारी केलं आहे आणि सांगितलं आहे. की, साई पूर्णपणे ठीक आहे.

साई धमर तेजच्या टीमने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे की, "साई धरम तेज पूर्णपणे ठीक आहे आणि आता तो हळूहळू रिकव्हर होत आहे. काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. त्याच्यावर रुग्णालयात उपचार घेतले जात आहेत. स्थिर झाल्यानंतर, त्याला उपचार सुरू ठेवण्यासाठी अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं.

या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. साई धरम तेजच्या डोळ्याला, छातीला कंबरेवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्याचं या फोटोंमध्ये दिसून येतंय. अपघाताची बातमी समोर आल्यानंतरच अभिनेत्याचा भाऊ वैष्णव तेज, काका पवन कल्याण आणि चुलत भाऊ वरुण तेज यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य रुग्णालयात पोहोचले.

त्याचवेळी, माधापूर पोलिसांनी सांगितलं की, केबल पुलावरून जाणारी साई धरम तेजची बाईक घसरली. या अपघातामुळे इतर कोणालाही दुखापत झाली नाही. त्याने हेल्मेट घातलं होतं आणि तो मद्यपान अवस्थेतही नव्हता. रस्त्यावरील चिखलामुळे त्याची दुचाकी घसरली. आणि त्याचा अपघात झाला.