TMKOC : जेठालालच्या 'बबिता'ची Luxury life पाहून तुम्हालाही घाम फुटेल

'बबिता'ची Luxury life ही कोणा Superstar पेक्षा कमी नाही, जाणून घ्या तिच्याविषयी    

Updated: Dec 5, 2022, 12:24 PM IST
TMKOC : जेठालालच्या 'बबिता'ची Luxury life पाहून तुम्हालाही घाम फुटेल title=
TMKOC Jethalal Munmun Dutta Babita's luxury life you will be shocked Taarak Mehta Ka Ooltah Chashmah nz

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टीव्हीचा (TV Industry) प्रसिद्ध कॉमेडी मालिका (Comedy Show) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 14  वर्षांपासून ही चाहत्यांचे मनोरंजन (Entertainment) करत आहे. ही मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात घर करुन गेले आहे. 14 वर्षांनंतरही या शोची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही हा शो प्रेक्षकांना खूप आवडतो. या शो मधील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या दमदार अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या शो मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) म्हणजेच बबिताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. या मालिकेतून अभिनेत्रीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. तिची फॅन फॉलोइंग (Fan Following) इतकी आहे की तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल नेहमीच जाणून घ्यायचे असते. (TMKOC Jethalal Munmun Dutta Babita's luxury life you will be shocked Taarak Mehta Ka Ooltah Chashmah nz)

जेठालाल आणि लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी बबिता (Babita) 2008 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या शोशी जोडली गेली होती. तेव्हापासून मुनमुन अजूनही या शोमध्ये कायम आहे. या शोमध्ये ती एका बंगाली (Bangali) महिलेची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे, जर आपण वास्तविक जीवनाबद्दल बोललो तर वास्तविक जीवनात ती खूप सुंदर आहे.

 

मुनमुन दत्ता ही बंगालची रहिवासी

मुनमुन दत्ताचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी दुर्गापूर बंगालमध्ये झाला. बंगाली वेशभूषेत ती कमालीची छान दिसते. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. तसेच, ती तिच्या चाहत्यांसाठी अनेकदा फोटो शेअर करत असते. तिचे पालक गायक होते, परंतु 2018 मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले. ती मुंबईत आईसोबत राहते.

हे ही वाचा - TMKOC : हे मॉं माताजी... म्हणणारी 'दयाबेन' मानधन न घेताच करायची काम, पण असं का?

कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगला सुरुवात

मुनमुन दत्ताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. जेव्हा ती कॉलेजमध्ये जाऊ लागली तेव्हा तिने मॉडेलिंग (Modelling) सुरू केले आणि याच काळात मुनमुनला 2004 मध्ये पहिला ब्रेक मिळाला. त्यामुळे तिला फारशी ओळख मिळाली नाही. हळूहळू ती बॉलिवूडकडे वळली. 2005 मध्ये तिला पहिला ब्रेक मुंबई एक्सप्रेसमधून (Mumbai Express) मिळाला. मुनमुन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' 2008 पासून आतापर्यंत या शोमध्ये काम करत आहे. या शोमधून ती भरपूर कमाई करत असतानाच ती तिच्या सोशल मीडियावरूनही खूप कमावते. तिला लक्झरी लाइफ जगायला आवडते.

आलिशान जीवन

मुनमुन दत्ताच्या आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिला खूप आलिशान जीवन जगणे आवडते. मुनमुन दत्ताने नुकतेच मुंबईत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याचबरोबर ती अनेक आलिशान वाहनांची मालकीणही आहे. मुनमुनकडे 23.33 लाखांची इनोव्हा क्रिस्टा कार देखील आहे. मुनमुन टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ते मारुती स्विफ्ट डिझायर पर्यंतच्या वाहनांची मालकीण आहे.