'टायगर जिंदा है'.. चित्रपटाने केला विश्वविक्रम

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची केमेस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते.

Updated: Nov 12, 2017, 02:36 PM IST
'टायगर जिंदा है'.. चित्रपटाने केला विश्वविक्रम   title=

 मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची केमेस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते.

काही दिवसांपूर्वी 'टायगर जिंदा है' चित्रपटाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला. आता हा जगभर धुमाकूळ घालत आहे. 
 
 अली अब्बास जफर दिग्दर्शित  ' टायगर जिंदा है' चित्रपट २२ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. पण केवळ ट्रेलर पाहुनच या चित्रपटाने नवनवे रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. 
 
 टायगर जिंदा है हा चित्रपट सर्वाधिक ट्विट झालेल्या चित्रपट ठरला आहे. सोबतच युट्युबवर  २० मिलियनचा टप्पा गाठणारा हा 'खानां'चा सगळ्यात वेगवाग चित्रपट ठरला आहे. पण या दोन रेकॉर्डससोबतच 'टायगर जिंदा है' हा चित्रपट 'मोस्ट लाईक्ड मुव्ही ट्रेलर' देखील ठरला आहे. 
 
 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या ट्रेलरला युट्युबवर सुमारे ७००हजार हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतकी लोकप्रियता जगात कोणत्याही इतर चित्रपटाला अजून मिळालेली नाही.  २०१७ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या बाहुबली २ ला ६४८ हजार लाईक्स मिळाले होते. लवकरच टायगर जिंदा है १ मिलियनचा टप्पा पूर्ण करणार आहे. 
 
 'एक था टायगर' या चित्रपटाचा 'टायगर जिंदा है' हा सिक्वेल आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ गुप्तहेरांची भूमिका साकारत आहे. भारत आणि पाकिस्तानसाठी वेगवेगळे काम करणारे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण पुढे त्यांचा प्रवास कसा होतो? हे पाहण्याची कमालीची उत्सुकता रसिकांमध्ये आहे.