व्हिडिओ : जेव्हा टायगर हवेतच फिरतो...

टायगर श्रॉफने अगदी कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated: Aug 22, 2018, 12:32 PM IST
व्हिडिओ : जेव्हा टायगर हवेतच फिरतो... title=

मुंबई : टायगर श्रॉफने अगदी कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाशिवाय टायगरकडे अॅक्शनची वेगळी स्टाईल आहे. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. टायगर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह असून काही खास व्हिडिओज तो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतो. अलिकडेच त्याने अॅक्शनचा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहुन तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

टायगरने हे व्हिडिओज इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यात तो हवेत उडी मारुन ३६० डिग्रीमध्ये फिरतो. हा व्हिडिओ शेअर करत टायगरने लिहिले की, हवेमध्ये स्वतःला मिठी मारण्याचा प्रयत्न.
टायगरचा हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. इंस्टाग्रामचा हा व्हिडिओ १९ तासात १२ लाखांहुन अधिक लोकांनी पाहिला आहे. 

 

....tried hugging myself in mid-air  #aka #cork360

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

सध्या टायगर 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात टायगरसोबत तारा सुतरिया आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या सिनेमातून बॉ़लिवूडमध्ये पर्दापण करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्राने केले आहे. सिनेमाच्या निर्मितीची सुत्रं करण जोहर कडे असून हा सिनेमा पुढील वर्षी १० मे ला प्रदर्शित होईल. 

 

The sunday effect #failll  #hadtoredeemmyself #izzatkasawaal 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on