'बागी ३'चा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बोलबाला

सोशल मीडियावर चित्रपटाची क्रेझ.

Updated: Mar 6, 2020, 04:24 PM IST
'बागी ३'चा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बोलबाला title=

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर 'बागी ३' चित्रपटाला चाहत्यांनी सोशल मीडियावर बॉकबास्टर घोषित केलं. ६ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. भारतात  हा चित्रपट तब्बल ४ हजार ४४० तर परदेशात १ हजार १००  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बागी ३' चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. 

प्रदर्शनाच्या पूर्वीपासून चित्रपटच्या चर्चांनी जोर धरला होता. तर आता प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर चित्रपाटाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

 

'बागी ३' चित्रपट ऍक्शनने परिपूर्ण असल्याचं सांगत युजरने चित्रपटाच्या कलाकारांचे देखील केले आहे. चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख यांची मध्यवर्ती भूमिका आहे. तर अंकिता लोखंडे, विजय वर्मा, जयदीप अहलावत, जमीर खोरी आणि दानिश भट्ट देखील मुख्य भूमिकेत झळकत आहे.