सलमानला ज्याची भीती होती तेच घडलं! 'टाइगर 3' मधील शाहरुखचा कॅमियो झाला लीक

Tiger 3 Salman Khan and Shahrukh Khan Clip Viral :  सलमान खानच्या टायगर 3 मधील त्याचा आणि शाहरुख खानचा एक सीनची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 12, 2023, 11:14 AM IST
सलमानला ज्याची भीती होती तेच घडलं! 'टाइगर 3' मधील शाहरुखचा कॅमियो झाला लीक title=
(Photo Credit : Social Media)

Tiger 3 Salman Khan and Shahrukh Khan Clip Viral : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी दिवाळी निमित्तानं त्यांच्या चाहत्यांना भेट दिली आहे. आज 'टाइगर 3' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात या चित्रपटाचे सकाळी 7 वाजे पासून 12 वाजे पर्यंतचे शो आहेत. पण दिल्लीच्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट 24 तास पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या काही प्रेक्षकांनी थिएटरमधील काही व्हिडीओ क्लिप्स शेअर केले आहेत. त्यातली एक क्लिप म्हणजे शाहरुख खानची एन्ट्री ती देखील 'पठाण' स्टाईलमध्ये. त्यानं साकारलेली ही पाहुण्या कलाकाराची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरली आहे. 

शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटात सलमानला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहिल्यानंतर आता 'टाइगर 3' मध्ये शाहरुखला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना शाहरुखला या चित्रपटात पाहण्याची संधी मिळाली आहे. 'टाइगर 3' प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शॉर्ट क्लिप्स शेअर केले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत सलमानच्या बाजूला त्याचे सगळे शत्रू असतात. तेव्हा त्याच्या जवळ एक चेंडू पडतो, ज्यामध्ये 'झुमे जो पठाण' हे गाणं वाजतं. हे ऐकून सलमान हसायला लागतो. त्याच वेळी, शत्रू आश्चर्यचकित होतात. त्यानंतर शाहरुख हवेत असलेल्या एका कन्टेनरला धरून येतो आणि मशीनगनने गोळीबार करतो. अशा प्रकारे तो सलमानला वाचवतो. 

इतकंच नाही तर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर गर्दी केली होती. तर अनेकांनी ढोल-ताशाच्या गजरात सेलिब्रेशन केलं आहे. तर काही चाहत्यांना टायगरचा लूक कॅरी केला असून केक देखील कापला आहे. शाहरुखला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना आनंद झाला आहे. 

हेही वाचा : पार्टी करीनाची मात्र चर्चा सारा-इब्राहिम आणि आलिया-रणबीरची 

दरम्यान, या स्पाय युनिव्हर्स चित्रपटात हृतिक रोशन देखील दिसणार आहे. खरंतर तो पोस्ट क्रेडिट सीनमध्ये दिसणार आहे. त्याची देखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. मनीष शर्मा यांनी सलमान खानच्या 'टाइगर 3' चं दिग्दर्शन केले आहे, तर आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटात इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. दरम्यान, त्याचा किंवा त्याच्यात आणि सलमानमध्ये झालेल्या कोणत्याही फाईटचा व्हिडीओ समोर आलेला नाही.