जावेद अख्तर सूनबाईच्या अगदी जवळ, लग्नातील फोटो पाहून सगळेच चकीत

या पार्टीसाठी खास थीम ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Updated: Feb 25, 2022, 01:00 PM IST
 जावेद अख्तर सूनबाईच्या अगदी जवळ, लग्नातील फोटो पाहून सगळेच चकीत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यामुळे दोघेही सध्या खूपच चर्चेत आहेत. लग्नानंतर त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खास पार्टीचं  देखील आयोजन केलं होतं.

या पार्टीत दीपिका पादूकोण पासून मलायका अरोरा पर्यंत मोठं- मोठे कलाकार ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले. या पार्टीसाठी खास थीम ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

नुकतेच फरहानने लग्न समांरभातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे. या न्यूलीवेड कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यातील एक फोटो सगळ्यांचं लक्षवेधत आहे. तो म्हणजे शिबानी दांडेकर आणि जावेद अख्तर यांचा...

शिबानी सासऱ्यांसोबत लग्न समारंभात डान्स करताना दिसत आहे. तिचं जावेद अख्तर यांच्यासोबत किती गोड बॉण्डिंग आहे हे या फोटोत पाहायला मिळत आहे. जावेद अख्तर आणि शिबानी यांचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. सूनबाईसोबत जावेद अख्तर अगदी मोकळेपणाने या सोहळ्यात वावरताना दिसले. 

अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरने 19 फ्रेब्रुवारी रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली. लग्नानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या जोडप्याच्या लग्नासाठी खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर अत्यंत खाजगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.