'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनूचा 'त्या' व्हिडीओने, सोशल मीडियाचा वाढवला पारा

लोकांचं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या हिट शोच्या बालकलाकारांवर खूप प्रेम आहे.

Updated: Aug 14, 2022, 06:36 PM IST
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनूचा 'त्या' व्हिडीओने, सोशल मीडियाचा वाढवला पारा title=

मुंबई : लोकांचं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या हिट शोच्या बालकलाकारांवर खूप प्रेम आहे. प्रेक्षकांनी ही मुलं लहानपणापासूनच मोठी झालेली पाहिलेली आहेत. अभिनेत्री निधी भानुशाली तारक मेहता या शोचा एक भाग होती.  अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. भूतकाळात तिचे कधी न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ अभिनेत्रीचा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल युजर्सना आश्चर्यचकित करत आहे. 

सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असलेली निधी भानुशाली अनेकदा तिच्या पोस्ट शेअर करत असते. जे तीच्या चाहत्यांना खूप आवडतात. दरम्यान, निधी भानुशालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाचं तापवत आहे. खरंतर अभिनेत्रीचा हा व्हिडिओ फार जुना आहे मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

निधीने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाईलने धुमाकूळ घालत आहे. निळ्या आणि गुलाबी लाईट्समध्ये ती बोल्ड लूक देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मधुर आवाजात एक गाणं गाताना दिसत आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या या पोस्टवर चाहते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि तिला गायिका बनण्याचा सल्ला देत आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तर  दुसरीकडे, तिच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री निधी भानुशालीने तिचे केस ओपन ठेवले आहेत. व्हायरल व्हिडिओमधील अभिनेत्रीचा लूक खूपच किलर दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्स तिला ती न्यूड असल्याच्या कमेंट करुन तिला ट्रोल करत आहेत. तर काहि युजर्स तिच्या या व्हिडिओचं कौतूकही करत आहेत.