ही आहे खरी Gangubai Kathiawadi, जिने आलिया देखील टाकल मागे

आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Updated: Feb 13, 2022, 03:34 PM IST
ही आहे खरी Gangubai Kathiawadi, जिने आलिया देखील टाकल मागे title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा बिग बजेट चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच आलियाच्या लूक आणि तिच्या अभिनयाचं ​​खूप कौतुक केलं जात आहे. पण आता एक छोटी मुलगी आलिया भट्टला टक्कर देत आहे. लोकं तिला 'खरी' गंगूबाई म्हणत आहेत.

छोट्या चिमुकलीने केलं सगळ्यांना दंग
'गंगुबाई काठियावाडी'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, एका चिमुरडीने आपल्या स्टाईलने सोशल मीडिया युजर्सना घायाळ केलं आहे. स्वत:ला आलियाची कॉपी म्हणवणाऱ्या  या चिमुकलीचं नाव हरिती आहे. जी 'गंगुबाई काठियावाडी'च्या डायलॉग्सची कॉपी करताना दिसतेय.  तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हूबेहूब गंगूबाई
हरितीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर ती आलिया भट्टसारखी अजिबात नाहीये, पण आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील डायलॉग्सवर ती अप्रतिम लिपसिंक करत आहे. तिचा हा व्हिडिओ  ईतका व्हायरल होतोय की, सोशल मीडियावर ही मुलगी चर्चेचा विषय बनली आहे.