मुंबई : आपल्या अभिनयामुळे बॉलिवू़डमध्ये जॉनी वॉकर कॉमेडिअन कलाकार म्हणून लोकप्रिय आहे. जॉनी वॉकर यांच खरं नाव बदरूद्दीन जमालुद्दीन काजी. यांचा जन्म मध्यप्रदेशच्या इंदौर शहरात झाला. जॉनी वॉकर यांचे वडिल मिल कामगार पण मिल बंद झाल्यावर त्यांचा संपूर्ण परिवार मुंबईत आले.
जॉनी वॉकर यांच्यामध्ये सुरूवातीपासूनच अभिनयाची जमक होती. नकला करण्यात ते अव्वल होते. याचमुळे बसमध्ये लोकांची नक्कल करून मिमिक्री करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करत असतं.
आपल्या अभिनयाने जॉनी वॉकर यांनी करोडो लोकांची मनं जिंकली आहेत. 'सीआईडी' सिनेमातील 'ऐ दिल है मुश्किल जीना यहां, जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जां', हे गाणं जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित केलं होतं. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या जॉनी वॉकर यांनी कंडक्टरचं देखील काम केलं आहे. याकरता त्यांना महिन्याते 26 रुपये मिळत असे.
50,60 आणि 70 च्या दशकात जॉनी वॉकर यांना सिनेमात कास्ट करणं म्हणजे सिनेमा हिट ठरणं असं गणितचं होतं. असं म्हटलं जातं की, निर्माते लेखकावर दबाव टाकून त्यांचा रोल सिनेमात घालण्यास सांगत असं. कारण जॉनी वॉकर यांच असं नाव होतं की, ते सिनेमासोबत जोडताच प्रेक्षकांची गर्दी व्हायची.
जमालुद्दीन काजी यांना जॉनी वॉकर बनवणारे गुरू दत्त होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, जेव्हा मी डायलॉग बोलायचो तेव्हा गुरूदत्त लाइट बॉय, असिस्टेंट, कॅमेरामनसोबत सगळ्यांकडेच गुरूदत्त पाहत असायचे.