मुंबई : वीणा मलिक तिच्या न्यूड फोटोशूटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.माहिती साठी तुम्हाला सांगतो की वीणा मलिकच्या न्यूड फोटोशूटमुळे बराच गदारोळ झाला होता. एवढेच नाही तर भारताविरुद्धच्या तिच्या वाईट भाषेमुळे ती चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. खरे तर एकदा बिना मलिकने विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. आपला एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, "बाकी सर्व सोडा, मी याआधी मिशीची अशी स्टाइल कधीच पाहिली नाही."
अनेकदा वीणा सोशल मीडियावर लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसते. प्रत्येक वेळी तिची कृती तिला चांगलीच महागातही पडते. या अभिनेत्रीला सोशल मीडियावरही खूप ट्रोलही केलं जातं. वीणा मलिक पाकिस्तानमध्ये राहते. तिचं लग्न दुबईचे व्यापारी असद खट्टक यांच्यासोबत झालं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांचा घटस्फोट झाला. या लग्नापासून तिला दोन मुलं आहेच. ज्यांचं संभाळ वीणाच करते. एक काळ असा होता जेव्हा ती तिच्या बिकिनी आणि बोल्ड आउटफिट्समुळे चर्चेत यायची. मात्र आता वीणा बुरखा आणि हिजाब परिधान करताना दिसते.
वादांसोबतच वीणा मलिक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. वीणा बिग बॉस 4 मध्ये दिसली आहे. तिचे रिलेशनशिप क्रिकेटरपासून सेलिब्रिटींपर्यंत होतं. अनेक जणांशी तिचं नाव जोडलं गेलं आहे.2010 मध्ये वीणा मलिक बिग बॉस 4 मध्ये दिसली होती यादरम्यान तिचं नाव अश्मित पटेल यांच्यासोबत जोडलं गेलं. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते.
एवढंच नाही तर वीणा पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आसिफसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आली होती. असंही म्हटलं जातं की, वीणा क्रिकेटरकडून पायाचा मसाजही करून घ्यायची. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं. यानंतर हे वेगळे झाले. एका मुलाखतीमध्ये वीणा मलिकने सांगितलं होतं की, मोहम्मद आसिफ तिच्या पायाला मसाज करायचा. अभिनेत्रीने असंही सांगितलं होतं की, मोहम्मद आसिफ तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि तो खूप लॉयल माणूस होता. मला ते क्षण आठवतात जेव्हा आसिफ माझ्या पायाला मसाज करायचा. मात्र त्यांचं नातं कायमचं टिकू शकलं नाही वीणा मलिकने त्याच्यासोबतचे सगळे संबंध संपवले.
यानंतर वीणा मलिकने दुबईचे बिझनेसमन असद बशीर खट्टक यांना डेट करायला सुरुवात केली. आणि काहीच दिवसात या दोघांनी लग्नही केलं. 2013 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वीणा मलिक दोन मुलांची आई झाली. मात्र असदसोबतचं तिचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांची सुखी संसार तुटला आणि यांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या 5 वर्षानंतर 2018 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर वीणा मलिकने पती असदवर मारहाण आणि मानसिक शोषणाचे आरोप केले होते.