देशातील 'या' दिग्दर्शकाचा एकही चित्रपट फ्लॉप नाही, दोन चित्रपटांची कमाई 1000 कोटींमध्ये

'बाहुबली' आणि 'RRR' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख दिली आहे. त्याच्या चित्रपटांची कथा असो किंवा VFX, त्यांची प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम मानली जाते.

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 10, 2024, 02:20 PM IST
देशातील 'या' दिग्दर्शकाचा एकही चित्रपट फ्लॉप नाही, दोन चित्रपटांची कमाई 1000 कोटींमध्ये title=

S. S. Rajamouli : एस.एस. राजामौली. एक दिग्दर्शक ज्याचे नाव समजताच मनात येईल... भव्य चित्रपट, भव्य दिग्दर्शक, भव्य यश. आपल्या कामासोबतच ते अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. ते आता बॉक्स ऑफिसचा बादशाह बनले आहेत. एस.एस राजामौली यांच्याबद्दलच्या अनेक मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. 

राजमौली यांचे पूर्ण नाव कोडुरी श्रीशैला श्री राजामौली आहे. त्यांचे साउथ इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1973 रोजी कर्नाटकमधील रायचूर येथे झाला आहे. राजामौली यांना चित्रपट, लेखन चित्रपटसृष्टीची दृष्टी त्यांच्या कुटुंबाकडून मिळाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एस. एस. राजामौली यांचे वडील 

एस.एस राजामौली यांचे वडील, पटकथा लेखक केवी विजयेंद्र प्रसाद आहेत. देशातील सर्वात मोठ्या चित्रपट लेखकांपैकी ते एक आहेत. त्यांना सिनेमाचा वारसा नक्कीच मिळाला होता पण त्यांच्या समजुतीने त्यांनी सिनेमा नव्या उंचीवर नेला. एस. एस. राजामौली यांनी त्यांच्या दिग्दर्शनाने चित्रपट निर्मितीची शैली बदलली आणि जागतिक ओळखही निर्माण केली.

आजपर्यंत सर्व चित्रपट सुपरहिट

राजामौली यांच्या चित्रपटांची एक वेगळीच ओळख आहे. VFX, बजेट तसेच ॲक्शन, थ्रिलर आणि प्रेम-रोमान्स. म्हणजे प्रेक्षकांच्या तिकिटाची पूर्ण किंमत वसूल केली जाते. ते असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी आजपर्यंत एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. त्यांचे चित्रपट करोडोंची कमाई करतात.

2 चित्रपटांचा 1000 कोटींमध्ये समावेश 

ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणाऱ्या राजामौली यांना 'बाहुबली' या चित्रपटामधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून ते जगभर प्रसिद्ध झाले. राजामौली यांचा करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. त्याचे दोन 'बाहुबली 2' आणि 'RRR' या चित्रपटांनी 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.  

2023 च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार

'RRR' बद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या 'नाटू नाटू' या गाण्याला 2023 च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. भारतीय सुपरहिरो, भारतीय पौराणिक कथा आणि भारतीय इतिहासावर चित्रपट बनवण्यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे.