'या' कपलनेही केली आता सुष्मिता आणि ललित मोदीची कॉपी?

डेटिंगपुर्वीही ते दोघे रिलेशनशिप्समध्ये होते.

Updated: Jul 16, 2022, 06:46 PM IST
'या' कपलनेही केली आता सुष्मिता आणि ललित मोदीची कॉपी? title=

मुंबईः ललित मोदी आणि सुष्मिता सेनमुळे सध्या सोशल मीडियावर त्या दोघांची चांगलीच हवा आहे. दोघेही सध्या रिलेशिपमध्ये असून ते एकमेकांना डेट करत आहेत नुकत्याच त्याचा फोटो व्हायरल झाला. डेटिंगपुर्वीही ते दोघे रिलेशनशिप्समध्ये होते. सध्या सुष्मिताने आपण ललित मोदीसोबत मॅरिड नाही असे सांगितले आहे तर ललित मोदीने आपण सुष्मिताला डेट करत असल्याचे सांगितले आहे. 

आयपीएलचा फॉर्मर चेअरमन ललित मोदीने 14 जुलैला सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे ट्विट केले होते त्यातून ते दोघंही डेट करत असल्याचे जाहीर झाले आहे. जो फोटो ललित मोदी सुष्मिता सेनसोबत टाकला होता तो फोटो सर्वत्र पसरला आहे. त्यावर हजारो कमेंट्स तसेच ट्रोलिंगही झाले आहे. ललित मोदी जो फोटो शेअर केला आहे त्यात त्याने सुष्मिताला त्याच्या कुशीत घेतले आहे.  

या दोघांच्या या बातमीनंतर तर सोशल मीडियावर मीम्स आणि प्रतिक्रियांचा सिलसिला सुरू झाला आहे. तेवढ्यातच या फोटोची हुबेहुब नक्कल आता या एका कपलनेही केली आहे. 

कॉमेडियन तन्मय भटने चाहत्यांसाठी त्याच्या एका मित्रासोबत एक फोटो इन्स्टावरून शेअर केला आहे ज्यात तन्मयनेही त्याला आपल्या कुशीत घेतले आहे. तो त्याचा मित्र आहे का आणखी कोणी आणि त्यातून त्यानेही ललित मोदीप्रमाणे आपले प्रेम असा फोटो टाकून जाहीर केला आहे का याबद्दल काही खुलासा नाही परंतु ललित मोदीसारखा तो फोटो कॉपी करत तन्मय भटनेही ललित मोदीची कॉपी केली आहे. 

ललितचा तो फोटो तन्मयने रिक्रिएट केला आहे आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जो पाहून तूम्हालाही नक्की हसू येईल. तन्मयने त्याचा मित्र नावेद मनक्कोडनसोबत हा फोटो शेअर केला आहे. मोदी आणि सेनप्रमाणे तेही सोफ्यावर आडवे झाले आहेत. तन्मयचा हात मनकोडनच्या डोक्यावर आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ''A new beginning. A new life. Over the moon. In love doesn’t mean marriage. YET. BUT ONE THAT BY GODS GRACE WILL HAPPEN. I JUST ANNOUNCED THAT WE ARE FLATMATES''. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोवर त्या दोघांना नेटिझन्सनी चांगलेच ट्रोल केले आहे.