खलनायक होऊन मिळवलं शाहरुखपेक्षा जास्त फेम, पैसे कमावण्यासाठी चित्रपटांची गरज नाही... 'हा' कलाकार कोण ओळखलं का?

This Actor : बॉलिवूडमधील या लोकप्रिय अभिनेत्याला तुम्ही ओळखलत का? शाहरुखच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आणि लोकप्रियता मिळवली. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 27, 2023, 03:29 PM IST
खलनायक होऊन मिळवलं शाहरुखपेक्षा जास्त फेम, पैसे कमावण्यासाठी चित्रपटांची गरज नाही... 'हा' कलाकार कोण ओळखलं का?  title=
(Photo Credit : Social Media)

This Actor : बॉलिवूडमधील कलाकारांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात त्यांचे लहानपणीचे फोटो तर त्यांच्या फॅन पेजवर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून या फोटोत दिसणारा हॅन्डसम हंक हा मॉडेलिंग जगात यशस्वी ठरला. त्यानं बॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची छाप सोडली. पण त्यानं हीरो नाही तर खलनायक म्हणून यशस्वी झाला. याच्याशिवाय मुंबईत एक बिझनेस सुरु केला की त्यातून तो कोटी कमावतो आणि चित्रपटाची प्रतिक्षा करत नाही. 

हे गोड बाळ ज्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली तो दुसरा कोणी नसून अर्जुन रामपाल आहे. त्यानंतर त्यानं एक अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याला खरी ओळख ही रॉक ऑनच्या भूमिकेतून. त्याला या भूमिकेसाठी नॅशनल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. पॉजिटिव भूमिकांमध्ये तर अर्जुन रामपालनं अप्रतिम काम केलं, त्याशिवाय त्याची खलनायकाची भूमिका देखील चांगलीच रंगली होती. 'रा-वन' आणि 'ओम शांती ओम' या चित्रपटांमध्ये त्यानं खलनायकाची भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांमध्ये हिरोच्या भूमिकेत शाहरुख खान होता. दरम्यान, अॅक्शन सीन्समध्ये जिथे अर्जुन रामपाल शाहरुखशी जशी फाईट करत होता हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 

1998 मध्ये फेमिना मिस इंडिया यूनिवर्स असलेल्या मेहर जेसियाशी अर्जुन रामपालनं लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची नावं माहिका आणि मायरा आहे. वीस वर्ष सुखी संसार केल्यानंतर ते विभक्त झाले. घटस्फोटाच्या जवळपास एका वर्षात अर्जुन रामपालनं त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ही प्रेग्नंट असल्याचे घोषणा केली. त्यानंतर 2023 मध्ये अर्जुन रामपाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. अर्जुन रामपालला एकूण चार मुलं आहेत. त्यातही त्याच्या मुलांच्या खर्चासाठी त्याला कोणताही चित्रपट करायची गरज नाही. चित्रपट शोधण्याची गरज नाही. कारण त्याच्या बिझनेसमधून त्याला खूप चांगले पैसे कमावतो. तो दरमहिन्याला कोटींमध्ये पैसे कमावतो असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. अर्जुन रामपालकडे रेस्टॉरंट लॅप- द लाउंज शिवाय एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा देखील मालक आहे. त्याच्या या कंपनीचे नाव चेंजिंग गणेशा असं आहे.