बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण, उर्मिला मातोंडकरसोबत डेब्यू; मग अचानक कुठे गेला 'हा' अभिनेता?

Shared Screen with Urmila Matondkar what he is doing now : उर्मिला मातोंडकरसोबत शेअर केली स्क्रिन... आज काय करतोय हा बालकलाकार

दिक्षा पाटील | Updated: Mar 4, 2024, 03:36 PM IST
बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण, उर्मिला मातोंडकरसोबत डेब्यू; मग अचानक कुठे गेला 'हा' अभिनेता? title=
(Photo Credit : Social Media)

Shared Screen with Urmila Matondkar what he is doing now : बॉलिवूड अभिनेता जुगल हंसराजला तर सगळेच ओळखतात. जुगल हंसराजनं 10 वर्षांचा असताना चाइल्ड आर्टिस्ट म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी 1983 मध्ये शेखर कपूरच्या 'मासूम' या चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसला होता. जुगलनं एक बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तर जुगल हंसराजनं 1994 मध्ये 'आ गले लग जा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही वर्ष काही चित्रपट केल्यानंतर दोघं जुगल हंसराज अचानक गायब झाले. 

जुगल हंसराजनं 'मासूम' या चित्रपटात उर्मिला मातोंडकरच्याभावाची भूमिका साकारली होती. मात्र, त्याचा खरा डेब्यू हा 'आ गले लग जा' या चित्रपटातून केला. इतकंच नाही तर या चित्रपटात त्यानं उर्मिला मातोंडकरसोबत महत्त्वाची भूमिका साकारली. जुगल हंसराजचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या काही खास पसंतीस उतरला नाही. त्यानंतर 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पापा कहते हैं' या चित्रपटात जुगल हंसराज महेश भट्ट यांच्या चित्रपटात दिसला. या चित्रपटातून जुगलनं प्रेक्षकांवर त्याची छाप सोडली. त्यानंतर लोक त्याला ओळखू लागले. यानंतर जुगल हा यश राज बॅनर खाली बनवण्यात आलेल्या 'मोहब्बतें' या चित्रपटातून खरी लोकप्रियता मिळाली. मात्र, त्यानंतर जुगलला जास्त चित्रपट मिळाले नाही. त्यानं काही मोठ्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. या सगळ्यात जुगल हंसराजनं छोट्या पडद्यावर देखील काम केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जुगल हंसराजनं काही चित्रपटांमध्ये एक लेखर आणि दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं. त्यातून त्याला काही खास लोकप्रियता मिळाली नाही. जुगल हंसराजनं 2016 मध्ये विद्या बालनच्या 'कहानी 2' मध्ये एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर तो 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिव शास्त्री बडबोला आणि लस्ट स्टोरीज 2 मध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारताना दिसला. 

हेही वाचा : '...तरी मी लग्नात येऊन गाणार नाही', लता मंगेशकर यांनी नाकारलेली लाखो डॉलर्सची ऑफर

जुगल हंसराजनं यूट्यूबर सल अहमदला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्याला या गोष्टीचं वाईट वाटलं होतं की त्याच्या प्लॅन प्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या नाही. जुगल हंसराजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटप्रमाणे, चित्रपटसृष्टीपासून स्वत: ला लांब केल्यानंतर आता ते लेखक देखील झाले. 2017 पासून आतापर्यंत 3 पुस्तक लिहिली आहेत. त्याचं पहिलं पुस्तक हे 2017 मध्ये 'क्रॉस कनेक्शन: द बिग सर्कस एडवेंचर' प्रकाशित झालं होतं. त्यानंतर 2021 मध्ये 'द कॉवर्ड एंड द स्वॉर्ड' हे पुस्तक प्रकाशित झालं. 2024 मध्ये त्याचं आणखी एक पुस्तक प्रकाशित झालं असून 'द ज्वेल ऑफ निसावा' प्रकाशित झालं.