सगळीकडे आता एकचं गाणं वाजणार! ओंकार भोजनेचं नवं गाणं तुम्ही ऐकलंत का?

एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Updated: Oct 27, 2023, 02:45 PM IST
सगळीकडे आता एकचं गाणं वाजणार! ओंकार भोजनेचं नवं गाणं तुम्ही ऐकलंत का? title=

मुंबई : एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी 'एकदा येऊन तर बघा' या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.   

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात 'आली आली गं भागाबाई' हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीतालाप्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे.  हे गीतरोहन प्रधान यांनी गायलं आहे.  मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहनयांचं संगीत लाभलं आहे.  या गीतातून  चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाजपहायला मिळतोय. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरचउलगडेल. चित्रपटाच्या गीताचे हक्क सारेगम कडे आहेत.  

२४  नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदायेऊन तर बघा'या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमारमोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपकपेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.गिरीश कुलकर्णी,सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार,  तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने,प्रसादखांडेकर,  राजेंद्रशिसातकर,  नम्रतासंभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर,रोहित माने,सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीती लकसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्तानेदिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, विनोदाची वेगवेगळी शैली असणाऱ्या भन्नाट विनोदी कलाकार मंडळींच्या एकत्र येण्यानं हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. 'एकदा येऊन तर बघा' प्रेक्षकांसाठी धमाल मनोरंजनाची ट्रीट असणार आहे. सात दिग्गज दिग्दर्शकांच्या घोषित झालेल्या सात मराठी चित्रपटांच्या शृंखलेतील ही दुसरी चित्रपट कलाकृती आहे. या आधीच्या 'अफलातून' या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता.

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे.