मुंबई : आजवर कलाविश्वात बऱ्याच सौंदर्यवतींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. कोणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं, तर कोणी सौंदर्याच्या व्याख्या बदलल्या. या साऱ्यामध्ये एक नाव विसरुन चालणार नाही. हे नाव म्हणजे हॉलिवूडमधील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री मर्लिन मन्रोचं. मर्लिन मन्रोचं नाव घेतलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.
मुख्य म्हणजे आज ही अभिनेत्री आपल्यात नसली तरीही तिच्या आयुष्याची जितकी वर्षे तिने या चित्रपटसृष्टीला दिली, त्यांच्या बळावर मर्लिनला सर्वांच्या हृदयात कायमचं स्थान मिळालं. अशा या मादक सौंदर्यवतीविषयी अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे.
१९६२ मध्ये मर्लिनचा संशयास्पद मृत्यू झाला होता. फार कमी वयातच तिने या जगाचा निरोप घेतला. मृत्युच्या काही दिवस आधीच तिने 'लूक' मासिकासाठी Douglas Kirkland या कॅनेडियन छायाचित्रकाराकडून फोटोसेशन करवून घेतलं होतं. नोव्हेंबर महिन्यात बेवर्ली हिल्स येथे ही दोन छायाचित्र काढण्यात आली होती.
Douglas Kirklandकडून टीपण्यात आलेल्या या दोन छायाचित्रांपैकी एका छायाचित्रात ती झोपलेल्या अवस्थेत वरच्या दिशेला पाहताना दिसत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये ती, उशीला पकडून दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मर्लिनची ही दोन अखेरची अधिकृत छायाचित्रं आहेत. येत्या काळात हीच छायाचित्रं ग्लोबल ऑक्शन हाऊस क्रिस्टीकडून या दोन्ही छायाचित्रांचा लिलाव होणार आहे. यासोबतच Douglas Kirkland चा हॅसलब्लेड ५००सी कॅमेरा आणि लेंसचाही लिलाव करण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबरला हा लिलाव होणार आहे.
Douglas Kirkland एक प्रसिद्ध छायाचित्रकार होते. त्यांनी मर्लिनव्यतिरिक्त इतरही काही सेलिब्रिटींची छायाचित्र टीपली आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री ब्रिगेट बर्दो, आर्डी हेपबर्न, सोफिया लॉरेन, कॅथरीन डेन्यूव, गायिका डायना रॉस, संगीतकार बिली, कोको चॅनल आणि इतरही काही सेलिब्रिटींचा समावेश आहे.