शूटिंगसाठी तयार होत असताना कपिल शर्मा जोरात का किंचाळला?

टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या कॉमेडी टायमिंगसाठी ओळखला जातो.

Updated: Nov 8, 2021, 08:32 PM IST
शूटिंगसाठी तयार होत असताना कपिल शर्मा जोरात का किंचाळला? title=

मुंबई : टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या कॉमेडी टायमिंगसाठी ओळखला जातो. तो शोमध्ये कायमच वर्चस्व गाजवत असतो. याशिवाय तो त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांचं मनोरंजन करत आहे. अलीकडेच, अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा मेकअप करताना ओरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कपिल जोरात किंचाळला
कपिल शर्मा त्याच्या फनी स्टाइलमुळे खूप चर्चेत असतो. त्याच्या शो व्यतिरिक्त, तो सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ शेअर करून चाहत्यांवर अधिराज्य गाजवतो. प्रसिद्ध कॉमेडियनने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो खूप मजेदार आवाज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू शांबणार नाही याची खात्री आहे कारण त्यात कपिलने अभिनय केला आहे. कपिल शर्माने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मागून चंदू चायवालाची भूमिका करणाऱ्या चंदन प्रभाकरचा आवाज ऐकू येतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांना व्हिडिओ आवडला
कपिल शर्माच्या या व्हिडिओमध्ये तो व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसला असून एक व्यक्ती त्याला तयार करण्यात मदत करत असल्याचं दिसून येतं. पण कपिल शर्मानं हा क्षण मजेशीर केला. या व्हिडीओवर भरभरुन प्रतिक्रिया येत असून लोकांना त्याची स्टाईल खूप आवडली आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं की, 'जनतेच्या मागणीनुसार.'