मुंबई : सोशल मीडियावर फक्त सामान्य महिलांना नाही तर अभिनेत्रींना देखील कायम अश्लील मेसेजचा सामना करावा लागतो. पूर्वी यासर्व गोष्टी समोर येत नव्हत्या पण आता अभिनेत्री उघडपणे आलेल्या अनुभवांचा खुलासा करतात. असाचं एक अनुभव दाक्षिणात्य अभिनेत्री आणि गायक सौंदर्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे. जेव्हा एका प्राध्यापकाने सौंदर्याला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवले, तेव्हा सौंदर्या गप्प बसली नाही, तर तिने त्या प्राध्यापकाला सडेतोड उत्तर दिलं.
सौंदर्यांने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, संबंधित प्राध्यापक ज्या कॉलेजचा आहे, तेथील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. 'प्राध्यापक असे अश्लील मेसेज इतर मुलींना पाठवतो, तर त्या कॉलेजच्या विद्यार्थिनी सुरक्षित असतील का? प्राध्यापक मदुराईमधील एक कॉलेॉजचा प्राध्यापक आहे..' असं सौंदर्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सौंदर्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय तिने अभिनेते रजनिकांत स्टारर 'कबाली' चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर देखील पदार्पण केलं आहे. चित्रपटात तिने एका पब सिंगरची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे ती 'मास्टर' चित्रपटाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आली.