एअरपोर्टवर 'या' अवस्थेत स्पॉट झाली अभिनेत्री, तिला पाहून प्रवाशांनाही बसला धक्का

 जस्मिन भसीन (Jasmine Bhasin) ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे. 

Updated: Oct 22, 2022, 10:29 PM IST
एअरपोर्टवर 'या' अवस्थेत स्पॉट झाली अभिनेत्री, तिला पाहून प्रवाशांनाही बसला धक्का title=
The actress was spotted at the airport in this state the passengers were also shocked nz

Jasmine Bhasin Style: जस्मिन भसीन (Jasmine Bhasin) ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक आहे. ती दिसायला गोंडस आहे तितकीच ती ग्लॅमरस देखील आहे. 'बिग बॉस 14' मध्ये एन्ट्री केल्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आहे. तिने नेहा कक्करच्या अलबम मध्ये देखील काम केले आहे. ती जितकी सुंदर आहे तितकीच स्टायलिश आहे. जस्मिन आज विमानतळावर दिसली तेव्हा तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विमानतळावर जास्मिनच्या बोल्ड अवताराने सर्वच थक्क झाले. तिनं स्वेटशर्ट हा पॅंटशिवाय स्टाईल केला तिच्या या यूनिक स्टाईलने सगळ्यांचा थरकाप उडाला. (The actress was spotted at the airport in this state the passengers were also shocked nz)

हे ही वाचा - पुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज गिल काहीसं असं करताना दिसली... पाहिलात का Video

 

सोशल मीडियावर छाया स्टायलिश लूक

Jasmin Bhasin Airport Look: ‘दिल से दिल तक’ या मालिकेतून घरोघरी पोहचणारी आणि प्रत्येकाच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या जस्मिनला बिग बॉसने आणखी लोकप्रिय केले.  तिचे स्टायलिश लूक नेहमीच समोर येतात पण हा लूक आतापर्यंतच्या सगळ्याच लूकमध्ये जबरदस्त आहे. आता जास्मिनच्या याच लूकची सर्वाधिक चर्चा होत आहे. त्याचीच झलक आज विमानतळावरही पाहायला मिळाली. पँटशिवाय फक्त स्वेटशर्ट कॅरी करून जास्मिन पुन्हा चर्चेत आली.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

जास्मिनसोबत गिप्पी ग्रेवाल

जास्मिनसोबत अली गोनीच्या जागी दुसरे कोणीतरी दिसले आणि ते म्हणजे पंजाबी अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवाल. वास्तविक, जास्मिन आता पंजाबी चित्रपटांकडे वळली आहे आणि लवकरच तिचा हनीमून नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये तिच्या विरुद्ध गिप्पी ग्रेवाल देखील आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे चित्रपटाची स्टारकास्ट दिवसरात्र प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या अनुषंगाने जास्मिन आणि गिप्पी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मुंबईत पोहोचले. 

हे ही वाचा - जान्हवीने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस, Video आला समोर...

जास्मिन भसीन लव्ह लाईफ

ही चर्चा होती जस्मिन भसीनच्या प्रोफेशनल लाईफची. आता आम्ही तुम्हाला त्याच्या लव्ह लाईफबद्दल सांगतो. बिग बॉसच्या घरात अली गोनीसोबत तिची जवळीक पाहायला मिळाली. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. बिग बॉसचे घर सोडल्यानंतरही त्यांचे नाते कायम आहे.