इस्लाममुळे सोडली अ‍ॅक्टिंग; 'या' सुंदर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

मनोरंजन विश्वाचा एक भाग बनून प्रसिद्ध होण्याची अनेकांची स्वप्नं असतात. पण काही स्टार्स असे आहेत जे इंडस्ट्रीची ग्लॅमर सोडून सामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगतात. 

Updated: Feb 20, 2023, 06:01 PM IST
इस्लाममुळे सोडली अ‍ॅक्टिंग; 'या' सुंदर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : मनोरंजन विश्वाचा एक भाग बनून प्रसिद्ध होण्याची अनेकांची स्वप्नं असतात. पण काही स्टार्स असे आहेत जे इंडस्ट्रीची ग्लॅमर सोडून सामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगतात. अनेक मुस्लिम भारतीय अभिनेत्रींनी इस्लामच्या मार्गावर जाण्यासाठी इंडस्ट्रीला अलविदा केलं आहे. आता प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री अनम फयाजनेहीने मनोरंजन जगतापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे.

अनिच्छेने इंडस्ट्री सोडली
पाकिस्तानी अभिनेत्री अनम फयाजने तिच्या एका पोस्टने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. तिने तिच्या पोस्टमधून आपण इडस्ट्रीला रामराम ठोकत असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,  हा संदेश लिहिणं माझ्यासाठी खूप कठीण आहे, कारण माझ्या करिअरमध्ये तुम्ही सर्वांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पण मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे

मला माझं आयुष्य इस्लामिक मार्गावर घालवायचं आहे. माझ्या डिजिटल उपस्थितीने इस्लामिक लाईफस्टाईल देखील रिफ्लेक्ट करेल. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, तुम्ही मला कायम लक्षात ठेवा. तुमच्या कधीही न संपणाऱ्या प्रेमाबद्दल खूप-खूप धन्यवाद.

कोणत्याही अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला मागं सोडणं खूप कठीण आहे. अनम फयाजसाठीही हा निर्णय खूपच कठीण आहे. पण शेवटी तिने मनाची समजूत काढली. इस्लामच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी  भिनेत्रीने आपलं अभिनय करिअर कायमचं सोडलं.

अनम हिजाबमध्ये दिसत आहे
आपल्या ग्लॅमरस अवताराने पडद्यावर चाहत्यांची मने जिंकणारी अनम फयाज आता फक्त हिजाब आणि बुरख्यातच दिसते. अनमच्या इन्स्टा हँडलवर तिचे सर्व फोटो हिजाबमध्ये पाहायला मिळतील. तिने तिच्या पोस्टमध्ये असंही नमूद केलं आहे की, तिची डिजिटल प्रेजंन्सी केवळ तिची इस्लामिक लाईफस्टाईल रिफ्लेक्ट करेल.

कोण आहे अनम फैयाज?
अनम फैयाज ही पाकिस्तानी टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 11-12 वर्षांपासून ती इंडस्ट्रीत जगतात सक्रिय आहे. मात्र, तिने इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली आहे. तिने अनेक नाटक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अहमद हबीब की बेटियों, मेरी माँ, इश्क इबादत, परवरिश यासह अनेक शोमध्ये त्याने उत्कृष्ट काम केलं आहे. अनम फैयाज या ३१ वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1991 रोजी कराची येथे झाला. 2016 मध्ये अनमने असद अन्वरसोबत लग्न केले. अभिनेत्रीला एक मुलगाही आहे.